अहमदनगर: राज्यपालांवर काही बोलू नये, असा प्रघातआहे. पण भगतसिंग कोश्यारीच राज्याचे प्रश्‍न सोडून अन्य अनेक विषयांवर एवढे बोलले आहेत की, त्यांच्यावर बोलणे भाग आहे. पण, त्यांच्या विषयीची एक आठवण आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. ती म्हणजे, उद्धव ठाकरेंचा राजीनामा स्वीकारण्यासाठी रात्री साडे दहापर्यंत कोश्यारी जागे होते. यासाठी त्यांनी जी तत्परता दाखवली, ती लोकांच्या लक्षात राहणारीच होती, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली.

औरंगाबादहून शिर्डी व नगरहून पुण्याकडे जाताना काही वेळ डॉ. गोर्‍हे नगरला थांबल्या होत्या. तेव्हा प्रसार माध्यमाशी त्यांनी संवाद साधला.
मावळते राज्यपाल कोश्यारी यांच्याबद्दल डॉ. गोर्‍हे म्हणाल्या , ‘राज्याचे प्रश्‍न सोडून महापुरुषांबद्दलची त्यांची भावनाशून्य, निराधार व असंवैधानिक वक्तव्ये राज्यपालपदाचा दुरुपयोग करणारी होती. औचित्य सोडून महापुरुषांची बदनामी करणारी होती. त्यावरून राज्यभरातून असंतोष व्यक्त झाल्यावर त्यांनी राज्यपालपद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा म्हणजे अपरिहार्यता होती. त्यांच्याविषयीची उद्धव ठाकरे यांच्या बद्दलची आठवण माझ्या कायम लक्षात राहणार आहे. ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ताबडतोब स्वीकारला जावा, यासाठी रात्री साडेदहापर्यंत जागण्याची जी तत्परता त्यांनी दाखवली, ती लोकांच्या लक्षात राहणारीच होती.’

प्रदीर्घ कार्याचा सन्मान, ‘मसाप’चा जीवनगौरव पुरस्कार प्राचार्य स. दि. महाजन यांना जाहीर
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांना शुभेच्छा देते, असे सांगून डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, ‘किमान त्यांनी इकडे येताना इकडचा इतिहास-भूगोल, संस्कृती व मानसिकता समजून काम करावे. मागील राज्यपालांबद्दल अनेक तक्रारी झाल्या. त्यामुळे राज्यपालांनी सरकारशी समन्वय ठेवताना त्यात समतोल ठेवायला हवा.’

Amazon, Flipkart ला दणका, सरकारने पाठवली नोटीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण
राज्याचे महिला धोरण येत्या ८ मार्चला जाहीर होणार

राज्याचे महिला धोरण येत्या ८ मार्चला जाहीर होणार आहे व या धोरणासाठी काही मुद्दे सुचवले असल्याचे सांगून डॉ. गोर्‍हे म्हणाल्या की, समान काम-समान वेतन देणारा आयोग आहे. पण, प्रसुती वा घरात कोणी आजारी असेल तर महिला नोकरीतून रजा घेतात, पण त्याचा परिणाम त्यांना प्रमोशन संधी कमी मिळते. यासाठी प्रमोशन संधीची वयोमर्यादा महिलांसाठी वाढवणे आवश्यक आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील जोडप्यांना फौजदारी,कौटुंबिक न्यायालय, दिवाणी न्यायालयात चकरा माराव्या लागतात. त्यामुळे अशा प्रकरणात एकच न्यायालय असावे, असे सुचवले असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला धोरणांचा अभ्यास करून महिलांनी नव्या महिला धोरणात काय असावे, याबाबत शासनाला सूचना करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

रविवार ठरला घातवार, भीषण अपघातात एकाच गावातील तिघांचा जागीच मृत्यू, वाहनाचा झाला चुराडा
शिर्डीच्या साई संस्थानने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची मुले तसेच कोविडमुळे पालक गमावलेल्यामुला-मुलींसाठी शिर्डीत निवासी संकुल उभारावे, अशी मागणी डॉ. गोर्‍हे यांनी केली. यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here