मशिद बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टला ‘इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ असे नाव असेल. सद्यस्थितीत ट्रस्टमध्ये समावेश असलेल्या ९ सदस्यांची नावे जाहीर झाली आहेत. झुफर फारुकी हे ट्रस्टचे अध्यक्ष असतील. ट्रस्ट सदस्य अतहर हुसेन हे त्याचे अधिकृत प्रवक्ते असतील.
इस्लामिक रिसर्च सेंटरचीही स्थापन होणार
मशिद बांधण्यासाठी अयोधेतील धन्नीपूर पूर गावात ५ एकर जागा देण्यात आली आहे. या जागेवर मशिद, इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटर, ग्रंथालय आणि हॉस्पिटल बांधले जाईल. त्यासाठी ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन’ नावाने एक ट्रस्ट तयार करण्यात आला आहे.
या ट्रस्टमधील एकूण ९ सदस्यांची नावे जाहीर करण्यात आल्याची माहिती सुन्नी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद मोहम्मद शोएब यांनी दिली. बोर्ड स्वतःच त्याचे संस्थापक विश्वस्त असेल आणि मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचा कार्यकारी प्रतिनिधी असतील. या व्यतिरिक्त ते स्वत: या ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आणि अध्यक्ष असतील, असे त्यांनी सांगितले. मंडळाचे अध्यक्ष झुफर अहमद फारुकी यांना ट्रस्टचे अध्यक्ष केले गेले आहे.
फैज आफताब हे मशिद कन्स्ट्रक्शन ट्रस्टचे कोषाध्यक्ष असतील. मोहम्मद जुनैद सिद्दीकी, शेख सैदुज्म्ममान, मोहम्मद रशीद आणि इम्रान अहमद यांना ट्रस्टचे सदस्य केले गेले आहे. मशिद कन्स्ट्रक्शन ट्रस्टचे सचिव अतहर हुसेन हे ट्रस्टचे अधिकृत प्रवक्तेही असतील.
दरम्यान, सरकारने मशिद बांधण्यासाठी सुन्नी बोर्डाला जमीन दिली आहे. या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पूर्णपणे पालन केले गेले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाने ती जमीन आमच्याकडून ताब्यात घेतली आहे, असं उत्तर प्रदेशचे मंत्री मोहसीन रझा यांनी सांगितलं.
पुढील महिन्यापासून बांधकाम सुरू होईल
मशिद कधी आणि कशी तयार करावी? याचा निर्णय फक्त सुन्नी वक्फ बोर्डच घेईल. सध्या सुन्नी बोर्डाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन कार्यकाळ वाढण्यापूर्वी त्यांना ६ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. यामुळे त्यांना मशिदीशी संबंधित निर्णय घेता येईल, असं मोहसीन रझा म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला राम जन्मभूमी वादात ऐतिहासिक निर्णय देताना वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर बांधण्याचे आणि मुस्लिमांना मशिदीच्या बांधकामासाठी अयोध्येतील एका प्रमुख ठिकाणी ५ एकर जमीन देण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने अयोध्या जिल्ह्यातील सोहावल तहसीलच्या धन्नीपूर गावात ५ एकर जमीन वक्फ बोर्डाला देण्यात आली.
वक्फ बोर्डाने त्या जागेवर मशिदीसह इंडो-इस्लामिक रिसर्च सेंटर, हॉस्पिटल आणि लायब्ररी तयार करण्याची घोषणा केली होती. हे सर्व बांधकाम कसे होईल याविषयी निर्णय घेण्यासाठी हा ट्रस्ट स्थापन केला जाणार होता. पुढच्या महिन्यापासून ट्रस्ट मशिदीचे बांधकाम सुरू करेल, असं सांगण्यात येतंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thank you ever so for you article post.
A big thank you for your article.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.