पुण्यात करोनाची आकडेवाडी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं पुणे हा करोनाचा नवा हॉटस्पॉट बनत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर खाटांची कमतरता ही नवी समस्याही निर्माण झाले आहे. असं असतानाही पुण्यातून ही समाधानकारक बातमी समोर आल्यानं काही प्रमाणात दिलासाही मिळत आहे. चंदननगर येथील श्रीमती दराडे यांना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानं करोनाची लागण झाली. मात्र, त्यांनी न डगमगता या करोनावर यशस्वी मात करून घरी परतल्या आहे.
पतीच्या निधनानंतर दराडे या चंदननगर येथे त्या आपल्या मुलीसह जावयाकडे राहतात. दराडे आजींचे जावई हरी घुगे यांनी याबाबत माहिती दिली. ‘माझ्या पत्नीला हृदयरोगाचा आजार आहे. तिच्यावर काही वर्षापूर्वी बायपासची शस्त्रक्रिया झाली. परंतु, नियमित तपासणी करावी म्हणून खासगी रुग्णालयात आम्ही गेलो. तेथे पत्नीची करोनाची चाचणीबरोबर माझीही चाचणी करण्यात आली. त्यावेळी आम्ही दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. मला काही लक्षणे नव्हती. त्यामुळे पत्नीला रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु आहेत. पण मला लक्षणे नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाइन झालो, या दोघांमुळं आजींनाही करोनाची लागण झाली मात्र, केवळ १० दिवसांतच त्या करोनामुक्त झाल्या असल्याचं, असं हरी घुगे यांनी सांगितलं.
वाचाः
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times