पुणे: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवण्यात प्रमुख भूमिका बजावणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे राज्यभरात दौरे करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या सगळ्या धावपळीमुळे आपले वजन जवळपास १० किलोने कमी झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बराचवेळ गप्पा मारल्या. या गप्पांच्या ओघात एकनाथ शिंदे यांनी सततची धावपळ आणि ओढाताण यामुळे आपले वजन घटल्याचे बापट यांना सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावत सुरुवातील सूरत, त्यानंतर गुवाहाटीत आपल्या समर्थक आमदारांसह बरेच दिवस मुक्काम ठोकला होता. राज्यात येऊन मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही एकनाथ शिंदे हे स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरील जवळपास सर्व कार्यक्रमांना उपस्थिती लावताना दिसतात. इतकेच नव्हे तर अगदी स्थानिक पातळीवरील कार्यक्रम आणि सणांनाही एकनाथ शिंदे आवर्जून जातात. या माध्यमातून शिंदे गटाची ताकद वाढवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. परंतु, या सगळ्या धावपळीत एकनाथ शिंदे यांची प्रचंड दमछाक होत असल्याचे आता समोर आले आहे.

भाजपकडून विधानसभेसाठी ‘मिशन २००’ जाहीर; एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

एकनाथ शिंदे यांनी आपले वजन घटल्याचे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना टोला लगावला. एकनाथ शिंदे शिवसेनेत होते तेव्हा त्यांना कोणतही टेन्शन नव्हतं. त्यामुळे त्यांचे वजन वाढत होते. आता एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे एजंट झाले आहेत. मोदी-शाह यांच्या टेन्शनमुळेच एकनाथ शिंदे यांचे वजन कमी झाल्याची खोचक टिप्पणी नाना पटोले यांनी केली.

वरळीत त्यांना मी गल्लीगल्लीत फिरायला लावणार आहे; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेना नाशिकमधून दिले आव्हान

कसबा आणि चिंचवडमध्ये चिंता करु नका, बापटांचा एकनाथ शिंदेंनी शब्द

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा विजय होईल, असा शब्द गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. कसब्याची चिंता करू नका. मी इथे बसलोय, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी आपलेच उमेदवार विजयी होतील, असे बापट यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here