मनमाड : रेल्वेच्या धडकेत चार गँगमनना प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन (टॉवर) चुकीच्या दिशेने आल्याने चौघा रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन (टॉवर) चुकीच्या दिशेने आले. त्यामुळे या ठिकाणी काम करत असलेल्या चार गँगमनना या इंजिनने उडवले. या दुर्दैवी अपघातात चारही गँगमनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकावर आज दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजून ४४ मिनिटांच्या सुमारास टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) राँग डाईव्हर्जनने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते.

पायाला शेण लागलं, कालव्यात धुताना ३० वर्षांचा तरुण बुडाला, तीन महिन्यांचं बाळ बापाला मुकलं
याच वेळी किमी २३० व पोल नंबर १५ ते १७ मधील ट्रॅक मेंटेन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. हे काम चौघे ट्रॅक मेंटेनन्स कर्मचारी करत असताना त्यांना रेल्वे लाईनची मेंटेनन्स करणाऱ्या टॅावरने धडक दिली. या अपघातात जबर मार लागल्यामुळे चौघा जणांचा मृत्यू झाला आहे.

तरुणीच्या ‘त्या’ इच्छेमुळे कॉलबॉय वैतागला, न्यूड फोटो बाहेर, सोलापुरात तरुणावर गुन्हा
मृतांमध्ये संतोष भाऊराव केदारे (वय ३८ वर्षे), दिनेश सहादु दराडे (वय ३५ वर्षे), कृष्णा आत्माराम अहिरे (वय ४० वर्षे), संतोष सुखदेव शिरसाठ (वय ३८ वर्षे) या चौघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सायन-माटुंगा ब्रिजवर बर्निंग कारचा थरार; तात्काळ अग्निशमन दल दाखल, अनर्थ टळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here