नवी मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह सामाजिक संघटनांकडून यासंदर्भात आनंद व्यक्त करण्यात आला. याशिवाय नव्या राज्यपालांनी कोश्यारी यांच्या प्रमाणं कारभार करु नये अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा मंजूर झाल्यानंतर नवी मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनता चांगली असल्याचं म्हटलं.

भगतसिंह कोश्यारी यांनी नवी मुंबई येथील बेलापूर येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. बेलापूर येथे भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुल मैदान येथे देवभूमी स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्तराखंडची पिठोली ही आकर्षक भेट महिलांना देण्यात आली. तसेच प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या संघांना स्मृती चिन्ह आणि धनादेश देण्यात आला. यावेळी उत्तराखंडची पिठोली भेट देऊन उत्तराखंडची आठवण झाली असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राज्यातील जनता चांगली आहे. महाराष्ट्रात देशपांडे असतील तर आमच्याकडे पांडे आहेत. महाराष्ट्रात राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहेत, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

पायाला शेण लागलं, कालव्यात धुताना ३० वर्षांचा तरुण बुडाला, तीन महिन्यांचं बाळ बापाला मुकलं

सध्या परंपरा बदलत चालली आहे, रक्षाबंधन भाऊबीज हे सण होत आहेत. आदिवासींनी परंपरा सोडू नयेत त्यांचा परंपरा खूप चांगल्या प्रथा आहेत, त्या जपल्या पाहिजेत. आपण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

पुण्यात पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू, राजगडावरून खाली येत होता, अचानक चक्कर येऊन पडला

नरेंद्र मोदींनी डिजिटल मध्ये जगात भारताला एक नंबरवर पोहोचवलं आहे. सौर ऊर्जेत भारताला जगात एक नंबरवर पोहोचवलं आहे. भारताला खेळामध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यास वेळ लागले. महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये एकापेक्षा एक क्रिकेट खेळाडू आहेत. त्यामुळे मुलांनी अभ्यास करावा मात्र मुलांनी खेळामध्ये रुची निर्माण केली पाहिजे, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. राष्ट्रकुल असो ऑलिम्पिक असो चांगलं यश मिळत आहे पण आपल्याला चांगला प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. महाराष्ट्रातील आणि उत्तराखंडमधील लोक सारखेच आहेत. तुम्ही संस्कृती, लोककला विसरू नका, असंही भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

Ghar Banduk Biryani: आकाश ठोसरवर चढला व्हॅलेंटाइनचा रंग! या अभिनेत्रीसोबत करतोय रोमान्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here