WPL Auction 2023, WPL Auction: महिला क्रिकेटचे नवे पर्व…WPL साठी आज होणार लिलाव, जाणून घ्या काही खास गोष्टी – womens premiere league 2023 when where to watch wpl auction number of players base price purse purse tspo
मुंबई: महिला क्रिकेट आता एका नव्या युगात प्रवेश करणार आहे. इंडियन प्रीमियर लीगसोबतच आता महिला क्रिकेटला अधिक चालना मिळावी या दृष्टीने वीमेन्स प्रीमियर लीग २०२३ यंदापासून खेळवली जाणार आहे. या आगामी स्पर्धेसाठी खेळाडूंची बोली आज लावली जाणार आहे. भारताच्या स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा यांच्यासह जगभरातील महिला क्रिकेटपटूंनी लीगमध्ये खेळण्याच्या इच्छेने लिलावामध्ये त्यांची नावे आहेत. पाहूया या लिलावामध्ये किती खेळाडू सामील आहेत, त्यांची बेस प्राईज किती आहे आणि हा लिलाव किती वाजता सुरु होणार आहे.
मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स अशा ५ फ्रँचायझीचा पहिल्या सीझनसाठी समावेश आहे. या लिलावासाठी ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. २०२ कॅप्ड आणि १९९ अनकॅप्ड खेळाडू आहेत. ८ असोसिएट देशांचे खेळाडूही आहेत. या निवडलेल्या खेळाडूंमध्ये २४६ भारतीय खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. या यादीत १६३ विदेशी खेळाडू आहेत. टी-२० वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे २८ खेळाडू तर इंग्लंडच्या २७ खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. लिलावामधील बेस प्राईजचा सर्वात मोठा ब्रॅकेट पन्नास लाख इतका आहे. ज्यामध्ये भारताच्या स्मृती मंधाना, शेफाली वर्म, कर्णधार हरमनप्रीत कौर यांचा समावेश आहे. टीम इंडियाच्या लेकींनी इतिहास रचला, पाकिस्तानवर ७ विकेटसनी दणदणीत विजय
लिलावासंबंधित काही खास गोष्टी
प्रत्येक संघाकडे खर्च करण्यासाठी प्रत्येकी १२ कोटी रुपये आहेत. प्रत्येक संघ किमान १५ आणि जास्तीत जास्त १८ खेळाडू खरेदी करू शकतो. एका संघात जास्तीत जास्त ६ विदेशी खेळाडू असतील. लिलावात सहभागी होण्यासाठी १५२५ खेळाडूंनी नोंदणी केली. लिलावासाठी एकूण ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली. एकूण २४ खेळाडूंनी ५० लाखांच्या ब्रॅकेटमध्ये स्वत:चे नाव नोंदवले आहे. दुसरा ब्रॅकेट ४० लाखांचा आहे ज्यामध्ये ३० खेळाडूंनी स्वतःला स्थान दिले आहे. तिसरी मूळ किंमत ३० लाख रुपये आहे. अनकॅप्ड खेळाडूंची मूळ किंमत १० ते २० लाखांपर्यंत आहे. पहिल्या सीझनमध्ये एकूण २२ सामने खेळवले जाणार आहेत. वीमेन्स प्रीमियर लीगमधील पहिली ५ वर्षे ८० टक्के नफा संघांमध्ये वितरित केला जाईल.
वीमेन्स प्रीमियर लीग २०२३ साठीचा होणार हा लिलाव दुपारी २:३० वाजता सुरु होईल. हा लिलाव मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे होणार आहे. स्पोर्ट्स १८ टीव्ही आणि जिओ सिनेमा अपवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:३० पासून लाईव्ह पाहता येईल.
महिला प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणारे संघ आणि संघ मालक
मुंबई इंडियन्स: रिलायन्स इंडस्ट्रीज, मुख्य प्रशिक्षक – चार्लोट एड्वर्डस रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: डियाजिओ दिल्ली कॅपिटल्स: जेएसडब्ल्यू ग्रुप आणि जीएमआर ग्रुप, मुख्य प्रशिक्षक- जोनाथन बॅटी गुजरात जायंट्स: अदानी समूह, मुख्य प्रशिक्षक – रॅचेल हेन्स यूपी वॉरियर्स: कॅपरी ग्लोबल, मुख्य प्रशिक्षक- जॉन लुईस