नवी दिल्ली: फूड डिलिव्हरी टेक कंपनी झोमॅटोने देशातील २२५ छोट्या शहरांमध्ये आपली सेवा बंद केली आहे. कंपनीने आपला तोटा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या एकूण ऑर्डर मूल्यामध्ये या शहरांचे योगदान फक्त ०.३ टक्के आहे. डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला ३४६.६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. शुक्रवारी कंपनीने तिसर्‍या तिमाहीचे (Q3FY23) निकाल जाहीर केले.

बापरे, चक्क जेवणासाठी उभे असताना एक आयडिया डोक्यात आली आणि कोट्यवधींची कंपनी उभी केली
कामगिरी घटली
या २२५ शहरांमधील सेवा बंद करण्याबाबत कंपनीने सांगितले की, गेल्या काही तिमाहीत या शहरांची कामगिरी चांगली राहिलेली नाही. मात्र, कंपनीने बाधित शहरांची नावे दिलेली नाहीत. त्याच वेळी कंपनीने नफा वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दलही सांगितले. झोमॅटोने माहिती दिली की ऑर्डरची संख्या वाढवण्यासाठी त्यांनी गोल्ड सबस्क्रिप्शन सुरू केले आहे. या कार्यक्रमात 9 लाख लोक सामील झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

हजार रुपयांचं खाणं फक्त २००-३०० रुपयांत! झोमॅटोमधला धक्कादायक स्कॅम उघड; CEO म्हणतात…
कोणत्या शहरांमध्ये व्यवसाय
झोमॅटो हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे अन्न वितरण अॅप आहे. गेल्या वर्षी २०२१-२२ मध्ये कंपनीचा फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी व्यवसाय देशातील १,००० हून अधिक शहरांमध्ये चालू होता. आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा ५ पटीने वाढून ३४३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तथापि, महसूल वार्षिक आधारावर १ हजार ११२ कोटी रुपयांवरून ७५ टक्के वाढून १,९४८ कोटी रुपये झाला.

चालतंय रे शंभरच आहे असे म्हणत Zomato आणि Swiggy वर आतापर्यंत किती खर्च केलाय ? असे करा माहित
झोमॅटोची सुरुवात कशी झाली?
ही कंपनी २००९ मध्ये हरियाणातील गुरुग्रामधून सुरू झाली होती. कंपनीचे नाव झोमॅटो नसून Foodiebay होते, जे ebay वरून प्रेरित होते. कंपनीची स्थापना दीपंदर गोयल आणि पंकज चढ्ढा यांनी केली होती. २००८ मध्ये झोमॅटो ही फूड डिलिव्हरी सर्व्हिस नसून रेस्टॉरंट डिस्कवरी सर्व्हिस होती. म्हणजेच तिचे काम शहरातील वेगवेगळ्या रेस्टॉरंटची माहिती देणे हे होते. ही सेवा अतिशय यशस्वी झाली आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत Foodiebay ने २ दशलक्ष ग्राहक आणि ८ हजार रेस्टॉरंट जोडले आहेत. २०१० च्या उत्तरार्धात कंपनीच्या संस्थापकाने झोमॅटो नाव दिले. यासोबतच कंपनीने फूड डिलिव्हरी सेवाही सुरू केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here