जळगाव : मावशीच्या गावाहून आईसोबत घरी परत येत असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईसमोरच धावत्या रेल्वेतून पाय घसरुन पडल्याने युवकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यात रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. प्रणव विजय बारी (वय २० वर्ष, रा. गांधी चौक, पिंप्राळा, जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. डोळ्यांदेखत मुलाच्या मृत्यूने आईचा मन हेलावणारा आक्रोश पाहून रेल्वेतील प्रवाशांचेही डोळे पाणावले होते

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रणव बारी हा आई-वडिलांसह प्रिंप्राळा भागातील गांधी चौकात वास्तव्याला होता. सध्या तो पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. नातेवाईकाच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी प्रणव हा जळगावात घरी आलेला होती.

शुक्रवारी प्रणव व त्याची आई ज्योती बारी असे दोघेही भुसावळ येथे मावशीकडे भेटण्यासाठी गेलेले होते. मावशी व मावस भावाला भेटून रविवारी सकाळी ७ वाजता प्रणव हा आईसोबत जळगाव येथे येणासाठी भुसावळ मेमू रेल्वेत बसला होता. आई ज्या सीटवर बसली होती, त्या सीटसमोरच असलेल्या दरवाजात प्रवण हा उभा होता. मेमूने भुसावळ स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर प्रणवचा तोल गेल्याने तो धावत्या रेल्वेतून आईच्या डोळ्यादेखत खाली पडला.

तरुणीच्या ‘त्या’ इच्छेमुळे कॉलबॉय वैतागला, न्यूड फोटो बाहेर, सोलापुरात तरुणावर गुन्हा
हा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्योती बारी यांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने प्रवाशांनी रेल्वेची चैन ओढून रेल्वे थांबवली, त्यानंतर ज्योती बारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर भुसावळ येथे राहणाऱ्या ज्योती यांच्या बहिणीचा मुलगा राकेश याने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत प्रणव याला खासगी रूग्णालयात हलविले. या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

मुलाच्या मृत्यूमुळे आई ज्योती बारी यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. प्रणवची मोठी बहीण स्वामिनी ही पुण्यात नोकरी करत असून प्रणव हा बहिणीसोबतच राहत होता. वडील भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. तर ज्योती बारी ह्या सुद्धा त्यांना व्यवसायात मदत करतात.

नळाला पाणी आल्याने मोटर लावली, विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय विद्यार्थिनीचा तडफडून मृत्यू

रात्री जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन येवून शोकाकुल वातावरणात प्रणव याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आईचा टाहो, मुलाचा आक्रोश… पत्रकार शशिकांत वारीसेंचा अपघात नसून घातपात झाल्याचा कुटुंबियांना संशय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here