यासोबतच भांडवली खर्चात कपात करण्याची योजना आहे. हा समूह आक्रमकपणे आपला व्यवसाय वाढवत होता परंतु हिंडेनबर्ग अहवालाने त्याची प्रतिष्ठा कलंकित केली. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील हा समूह आता आपली आर्थिक स्थिती सुधारण्यात व्यस्त आहे. अहवालानुसार अदानी समूहाचा फोकस आता रोख बचत, कर्ज फेडणे आणि तारण ठेवलेल्या शेअर्सची पूर्तता करण्यावर असेल.
अदानी समुह आर्थिक स्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात
हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत नकारात्मक अहवाल जारी केला होता. या अहवालात अदानी समूहाने शेअर्सच्या किंमतीत फेरफार केल्याचा दावा करण्यात आला होता. अदानी समूहाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अनेक शेअर्सने तर 5५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली. यामुळेच अदानी समूह आता डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अदानी समूहाने तीन महिन्यांसाठी गुंतवणूक योजना थांबवली तर तीन अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकते. ही रक्कम कर्ज फेडण्यासाठी किंवा रोख रक्कम वाढवण्यासाठी वापरली जाऊ शकते.
तीन कंपन्यांनी तारण ठेवलेले अतिरिक्त शेअर्स
दरम्यान, अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी त्यांचे अतिरिक्त शेअर्स बँकांकडे गहाण ठेवले आहेत. या बँकांनी अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला कर्ज दिले आहे. या कंपन्यांनी त्यांचे शेअर्स SBICAP ट्रस्टी कंपनीकडे तारण ठेवले आहेत. यामध्ये अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ), अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांचा समावेश आहे.