हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यावर आता गौतम अदानी आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी ग्रुपच्या महसूल वाढीचे लक्ष्य आणि भांडवली खर्च कमी करण्याचा विचार करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समूह पुढील आर्थिक वर्षासाठी महसूल वाढीचे लक्ष्य ४०% वरून १५-२० टक्क्यांपर्यंत कमी करू शकते. दरम्यान, बाजाराच्या सकाळच्या सत्रात अदानी ग्रुपचे शेअर्स कसे ट्रेंड करत आहेत ते सविस्तर जाणून घेऊया.
अदानींचे शेअर्स एकसाथ पडले
बाजाराच्या सोमवारच्या सत्रात अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करताना दिसले. अदानी समूहाची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ४.६७% किंवा ८६.२५ रुपयांनी घसरून १७६१.१० रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात अदानी पोर्ट्सचे शेअर्स १.७६ टक्के किंवा १०.३० रुपयांनी घसरून ५७३.५५ रुपयांवर व्यवहार करत आहेत.
दरम्यान, अदानी पॉवरच्या स्टॉकमध्ये सतत लोअर सर्किट दिसत असून आज शेअर ५% किंवा ८.२० रुपयांनी १५६.१० रुपयांवर घसरला आहे. अदानी ट्रान्समिशनच्या स्टॉक देखील आज लोअर सर्किटला खुला झाला. स्टॉक ५ टक्के किंवा ५९.३० रुपयांनी घसरून ११२६.८५ रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय अदानी ग्रीन आणि अदानी टोटलमध्ये लोअर सर्किट दाखवत आहे. तसेच अदानी विल्मारच्या शेअरमध्ये घसरण झाली असून सुरुवातीच्या व्यवहारात स्टॉक ४.३१ टक्क्यांनी किंवा १८.८० रुपयांनी घसरून ४१७.३० रुपयांवर व्यवहार करत होता.
NDTV मध्ये लोअर सर्किट
अदानी समूहाने नुकतेच अधिग्रण केलेल्या एनडीटीव्हीचे शेअर्स गुरुवारी ४.९२ टक्क्यांनी घसरले तर शुक्रवारी शेअर ३.६५ टक्क्यांनी घसरण झाली. तर सोमवारी स्टॉकमध्ये लोअर सर्किट बसवण्यात असून शेअर ४.९८ टक्क्यांनी किंवा १०.४० रुपयांनी १९८.२५ रुपयांवर घसरला आहे.
सिमेंट कंपन्या
अदानी समूहाची सिमेंट कंपनी ACC सिमेंटचे समभाग सुरुवातीच्या व्यवहारात २.२९% किंवा ४३ रुपयांनी घसरून १८३८ रुपयांवर व्यवहार करत होता. तर अंबुजा सिमेंटचा शेअर ३.४२ टक्क्यांनी किंवा १२.३५ रुपयांनी घसरून ३४८.७० रुपयांवर व्यवहार करत होता.