नवी दिल्ली: देशात करोनाचा कहर वाढतच चालला आहे. दररोज कोरोनाचे हजारो रुग्ण वाढत आहेत. तसेच कोरोनाच्या संसर्गाने शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाचे रुग्ण १५ लाखांवर गेले आहेत. यादरम्यान, केंद्रीय गृहंत्रालयाने अनलॉक – 3 च्या तयारीला वेग दिला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक – 3 साठी शनिवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. जाणून घेऊया काय सुरू असेल आणि काय बंद राहील…..

हे सर्व सुरू असेल
– योग संस्था आणि व्यायामशाळा उघडण्यास परवानगी

– रात्री लागू केलेली संचारबंदी हटवण्यात आली आहे

– नागरिकांना नियमांचे पालन करून स्वातंत्र्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता येईल

– ३१ ऑगस्टपर्यंत कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

– ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक, मुलं आणि गर्भवती महिलांना घरीच राहण्याचा सल्ला

हे सर्व बंद राहील

– शाळा / महाविद्यालये

– सिनेमा हॉल, एंटरटेन्मेंट पार्क

– मेट्रो ट्रेन

– सामाजिक कार्यक्रमात अधिक नागरिकांच्या सहभागावर निर्बंध

– धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक किंवा करमणूक संबंधित कार्यक्रमांवर बंदी कायम

– कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन काटेकोरपणे लागू राहील

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here