याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रसन्ना मंगरुळकर हा उच्चशिक्षित असून त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तसेच त्याची आई ही चंद्रपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होती. प्रसन्ना याला पिंपरी चिंचवड येथे एका खासगी बँकेत नोकरी लागली. त्यानंतर साधारण २०१५ च्या सुमारास प्रसन्ना आणि त्याची आई हे दोघे दापोडी गावठाण येथे राहायला आले.
त्यावेळी मारुती काटे यांच्याकडे मायलेक भाडेकरू म्हणून रहात होते. दोन वर्ष ते काटेंच्या रूमवर राहत होते. त्या कालावधीत काटे याने त्याच्या आईवर अत्याचार केले असल्याचे प्रसन्ना याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर ते दोघे जण मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे राहायला गेले, काही दिवसांनी प्रसन्ना याच्या आईचे निधन झाले. आपला एकुलता एक आधार असलेली आई गेल्याने तो एकटा पडला. त्यानंतर त्याने यूपीएससी करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. मात्र काटे सतत त्रास आणि धमकी देत असल्याचा दावा त्याने केला. आईच्या अत्याचाराचा राग देखील त्याच्या मनात धुमसत होता.
घटनेचा बदला घेण्यासाठी त्याने दिल्ली ते पुणे असे विमानाचे तिकीट काढले. बॅगमध्ये एक ब्लॅंकेट, टॉवेल आणि दीड हजार रुपये घेऊन त्याने शनिवारी सायंकाळी पुणे गाठले. विमानतळावरून तो पायी चालत दापोडी येथे आला. त्याने एका दुकानातून जमीन खोदण्याचा टिकाव विकत घेतला.
दापोडी गावठाणात काटे यांच्या घरात जाऊन त्याने मारुती उर्फ शंकर काटे यांचा टिकावाने मारून खून केला. त्याला प्रतिकार करणाऱ्या काटे यांच्या पत्नीला देखील प्रसन्नाने ठार केले . त्यानंतर प्रसन्ना रक्ताने माखलेल्या अवस्थेत हातात टिकाव घेऊन पोलिस स्टेशनला जाण्यासाठी निघाला. मात्र नागरिकांनी त्याला अडवले आणि पोलिसांना पाचरण केले. रस्त्याने जाताना तो ‘जगदंब जगदंब’असा जयघोष करीत होता. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
Famous Pattice Center In Pune | 6 Types Of Pattice | Pune Street Food