heart attack, लग्नाचा पहिला वाढदिवस, पती-पत्नी स्टेजवर; नाचता नाचता भावोजी कोसळले, मृत्यूने गाठले – man dies due to heart attack while dancing on wedding anniversary in prayagraj
प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी एका व्यक्तीनं गेस्ट हाऊसमध्ये पार्टी ठेवली होती. पार्टीसाठी नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आलं होतं. मोठ्या बहिणीचं कुटुंबदेखील पार्टीला आलं होतं. पार्टीत नाचताना बहिणीच्या पतीला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेनं आनंदाचं वातावरण क्षणार्धात बदललं. संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.
पार्टीसाठी स्टेज सजवण्यात आला होता. पती-पत्नी स्टेजवर बसले होते. नातेवाईक चित्रपटातील गाण्यांवर थिरकत होते. काही वेळानंतर पती, पत्नीदेखील नातेवाईकांसोबत नाचू लागले. त्याचवेळी त्याच्या मोठ्या बहिणीचा पती (अमरदीप, वय ४० वर्षे) नाचता नाचता अचानक कोसळला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांनी अमरदीप यांना तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे अमरदीपचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. अस्वस्थ वाटू लागलं, ECG नॉर्मल; तासाभरात तरुणाचा मृत्यू; १२ दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा कार्यक्रम अतिशय उत्तमपणे सुरू होता. सारेच आनंदात होते. त्यावेळी नाचता नाचता अमरदीप अचानक कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचं सुनील वर्मा यांनी सांगितलं. नैनीचे रहिवासी असलेली वर्मा कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला. अमरदीप सिव्हिल लाईन्सच्या क्लाईव्ह रोडजवळच्या सीतापूर हॉस्पिटल कॅम्पसमध्ये वास्तव्यास होते. त्यांना दोन मुलं आहेत. नवरदेवानं घातला हार, नवरीचा लग्नास नकार; वरात माघारी जाताच मंडपात भलताच प्रकार अमरदीप औषधं पुरवठादार म्हणून काम करायचे. त्यांची आई सीतापूरच्या एका रुग्णालयात काम करते. कार्यक्रम सुरू असताना अमरदीप यांना एकदा अस्वस्थ वाटलं होतं. थकलेले अमरदीप एकदा खाली बसले. त्यानंतर त्यांना बरं वाटू लागलं. त्यामुळे ते पुन्हा नाचू लागले, अशी माहिती कार्यक्रमात सहभागी झालेल्या नातेवाईकांनी दिली.