ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने भेलच्या शेअर्ससाठी अंडरवेट रेटिंग कायम ठेवले आहे. शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी ३४ रुपयांचे लक्ष्य देण्यात आले आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते तिसऱ्या तिमाहीमध्ये कामकाजातील उत्पन्न (EBITDA)अंदाजापेक्षा कमी राहिला आहे.
कंपनीच्या ऑर्डरमध्ये वाढ
भेल कंपनीचे औद्योगिक उत्पन्न देखील वार्षिक आधारावर २१ टक्क्यांनी कमी झाले आहे. मार्जिन देखील ३.५० टक्क्यांनी घसरले तिसऱ्या तिमाहीत नवीन ऑर्डरमध्ये १ टक्क्याची वाढ झाली. यामध्ये औद्योगिक व्यवसायाचा वाटा ५० टक्के होता. आणखी एक जागतिक ब्रोकरेज फर्म नोमुराने भेलच्या शेअरला न्युट्रल रेटिंग दिले आहे. शेअरवर ७९ रुपयांचे लक्ष्य देण्यात आले आहे.
डिसेंबर तिमाहीचे निकाल
भेल कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा ११७.४ टक्क्यांनी वाढून ३१ कोटी झाला आहे. जी मागील वर्षीच्या तिमाहीत १४.३ कोटी होता. उत्पन्नात २.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न ५३६३.४ कोटी रुपये होते. तर मार्जिन देखील १.७% वरून २.७% पर्यंत वाढले.
(टीप: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या)