मुंबई: महिला प्रीमिअर लीग (WPL)साठी मुंबईत खेळाडूंचा लिलाव सुरू झाला आहे. जिओ वर्ल्ड वर्ल्ड कंवेशन सेंटर येथे महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठी या लिलावाला सुरूवात झाली. लिलावातील पहिलीच बोली भारतीय संघातील सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मानधनावर लावण्यात आली. तिची बेस प्राइस ५० लाख होती आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने स्मृतीला ३ कोटी ४० लाखांना संघात घेतले.
महिला प्रीमिअर लीग लिलावाचे Live अपडेट
> ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीला बेंगळुरू संघाने १.७ कोटींची बोली लावत संघात घेतले.
>ऑस्ट्रेलियाच्या ॲशली गार्डनरला गुजरात संघाने ३.२० कोटींना खरेदी केले. बेस प्राइस ५० लाख इतकी होती
> न्यूझीलंडच्या सोफी डिवाइनला ५० लाखांची बोली लावत बेंगळुरू संघाने खरेदी केले
>हरमनप्रीत कौर, १.८० कोटी, मुंबई इंडियन्स
> स्मृती मानधना, ३.४ कोटी- बेंगळुरू संघ