नवी दिल्ली: भारतीय रिझर्व बँकेने गेल्या वर्षांपासून सहा वेळा रेपो दरात विक्रमी वाढ केली आहे. यामुळे सार्वजनिक-खासगी क्षेत्रातील बँका आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांनी गेल्या काही काळापासून कर्जाच्या व्याजदरात अनेक वेळा वाढ केली आहे. व्याज दरात वाढ झाल्यामुळे कर्जदारांवर ईएमआयचा दबावही वाढला आहे. अशा परिस्थितीत गृहकर्जदारांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज भरावा लागत आहे. अशा स्थितीत जर तुम्ही देखील महागड्या EMI ने त्रस्त आहात आणि तुमचा EMI स्थिर ठेवायचा असेल तर तुम्ही फक्त एका मार्गाने हे काम करू शकता.

मे २०२२ पासून आधीच लक्षणीय वाढलेले EMI आणखी वाढतील कारण बँकांनी कर्जदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ईएमआयमध्ये अशा वाढीमुळे अनेक कर्जदारांच्या खिशाला चटका नक्कीच बसेल. पण तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तिथे अर्ज करून तुमच्या कर्जाचा EMI स्थिर करू शकता. बँकेने तुमचा अर्ज स्वीकारल्यास तुम्ही जुन्या EMI वर कर्जाची परतफेड करू शकता.

होम लोन आणि त्यावरचा इंटरेस्ट भरताना नाकी नऊ आलेत? एकदा वाचा आणि ‘हा’ उपाय करून बघा
बँकेच्या अर्जात काय?
तुम्हाला तुमच्या कर्जावर जुने EMI काय ठेवायचे असल्यास तुम्हाला बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन कर्ज विभागाशी संपर्क साधावा लागेल. येथे तुम्ही एक अर्ज लिहून तुम्हाला तुमच्या कर्जाचा EMI कमी करायचा आहे आणि तुमच्या कर्जाचा कालावधी वाढवायचा आहे, अशी माहिती द्यावी लागेल. यानंतर बँकेद्वारे तुमचा अर्ज तपासला जाईल आणि त्यानंतर तुमच्या कर्जाची मुदत आणखी वाढवली जाईल.

गृहकर्ज EMI वाढण्याची चिंता आहे? व्याजाचे ओझं कमी करण्यासाठी या युक्त्या वापरुन पाहा
अर्जात कोणती माहिती द्यायची
लक्षात घ्या की अर्ज करताना संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने देणे आवश्यक आहे. पहिले तुम्हाला तुमच्या कर्जाची माहिती द्यावी लागेल. यासोबतच कर्जाशी जोडलेल्या खात्याचा क्रमांक, पत्ता, नाव आणि इतर माहिती देखील द्यावी लागेल. तसेच आवश्यक असल्यास बँक कर्मचारी तुमच्याकडून ओळखीसाठी कोणतेही प्रमाणपत्र मागू शकते. आणि तुम्हाला या EMI वर पूर्वीपेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज भरायचे आहे, असे अर्जात तुम्हाला स्पष्टपणे लिहावे लागेल.

Home Loan EMI: व्याजदर पुन्हा वाढले, तुमचा EMI कितीने वाढणार? जाणून घ्या
EMI वाढवणे हा एक चांगला पर्याय!
जर तुम्ही कर्जाचे EMI भरत आहात आणि कर्ज महागले असेल, तर तुमचे कर्ज लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कर्जाची EMI वाढवणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळे तुमचा कार्यकाळ कमी होईल, मात्र यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे असले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here