सांगली: सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर यांच्यासह सहा जणांचा बुधवारी संसर्गामुळे मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या ७० झाली. दरम्यान, बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात करोनाचे १६७ नवे रुग्ण आढळले. यातील ११६ रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २०६५ एवढी झाली आहे. मध्येच रुग्णांची संख्या गतीने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. ( )

वाचा:

गेल्या पंधरा दिवसांपासून सांगली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळत आहेत. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात नवे १६७ रुग्ण आढळले, तर सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महापालिकेचे माजी महापौर हारूण शिकलगार यांच्यासह एका ५५ वर्षीय नगरसेवकाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शिकलगार यांना मंगळवारी सकाळपासून धाप लागून श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मिरजेतील वॉन्लेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, करोना चाचणीसाठी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हॉस्पिटल परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

वाचा:

जिल्ह्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या २०६५ एवढी झाली आहे, तर बुधवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात करोना बळींची संख्या ७० एवढी झाली. एकूण रुग्णांपैकी ९५२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या १०४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाउनमध्यचे करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

वाचा:

कोल्हापुरात स्थिती आणखी गंभीर

कोल्हापुरात बुधवारी रात्री आलेल्या अहवालानुसार एक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, दोन पोलीस, तीन डॉक्टर आणि एका नगरसेविकेच्या पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसभरात पाचशेपेक्षा अधिक लोकांना करोना संसर्गाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापुरात बुधवारी दिवसभर करोना संसर्गाने हाहाकार माजवला. आतापर्यंत साडेपाच हजार लोकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दिवसभरात १३ बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची आतापर्यंतची संख्या १५५ झाली आहे. गेल्या २४ तासात कोल्हापुरात करोनाचे १५५ नवीन रुग्ण आढळले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here