धुळे : धुळे तालुक्यातील बोरकुंड गावातील रतनपुरा शिवारात एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतीकामाच्या लेव्हलिंगसाठी सांगली आणि साताऱ्याहून काम करणारे कॉन्ट्रॅक्टर हे दरवर्षी धुळ्यात येत असतात. त्या निमित्ताने बोरकुंड भागातील रतनपुरा शिवारात एका शेतात सांगली, साताऱ्याहून आलेल्या दोन तरुण कॉन्ट्रॅक्टरकडून लेव्हलिंगचे काम करण्यात येत होते. दरम्यान, कॉन्ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर चालकानेच डोक्यात टॅमी घालून खून केल्याची घटना घडली. ही घटना रविवार घडली आणि आज सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर ट्रॅक्टर चालक हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.

सातारा, सांगली जिल्ह्यातील शेती सपाटीकरणाचा व्यवसाय करणारे दोन जण धुळे तालुक्यातील बोरकुंड भागातील रतनपुरा येथे कामासाठी आले होते. त्यातील एकाचा बोरकुंडमधील शेतात ( MH 11 DA 1739) क्रमांकाच्या ट्रॅक्टरजवळ मृतदेह आढळून आला. शेतातून येणाऱ्या जाणाऱ्यांना काल संध्याकाळी तो दिसला. पण तो झोपलेले असल्याचे अनेकांना वाटले. पण सकाळी शंका आली आणि जवळ गेल्यानंतर त्याचा खून झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी मिळालेल्या आधारकार्डच्या आधारे मृत व्यक्तीचे नाव आदर्श दत्तात्रय पिसाळ (वय २३ रा. शेरेशिंदेवाडी जि. सातारा) असे असल्याचे समोर आले आहे. आदर्श पिसाळ याच्या कपळाजवळ घाव घातल्याने हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

सिक्रेट माहिती हाती लागली, पोलिसांनी छापा टाकला अन् समोरचं दृश्य पाहून सर्वच हादरले
सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळेस ठसे तज्ज्ञांना देखील पाचरण करण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण बोरकुंड परिसरासह धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हा खून का केला? याचे कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आता पोलीस घटनेतील आरोपीचा शोध घेत आहेत.
धुळे हादरले; धारदार शस्त्राने वार करत पत्नीला संपवले, नंतर पतीने विष घेत उचलले टोकाचे पाऊल

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here