सांगली: गेल्यावर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस , आणि या तिन्ही जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संततधार पाऊस आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने , कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्यांना आलेल्या महापुराने हाहाकार उडाला होता. यंदा मात्र दक्षिण महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने तिन्ही जिल्ह्यांत दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

कोल्हापूरमध्ये दरवर्षी सरासरी आठशे ते एक हजार मिमी पाऊस पडतो. सांगली आणि सातारा जिल्ह्याचे पूर्व भाग वगळता पश्चिम भागात जोरदार पाऊस पडतो. यामुळेच हे तिन्ही जिल्हे पाणीदार मानले जातात. गेल्यावर्षी जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात गतीने वाढ झाली. पावसाची संततधार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही कायम राहिल्याने महापुराची गंभीर परिस्थिती ओढवली होती. यामुळे तिन्ही जिल्ह्यातील सुमारे दहा लाख पूरग्रस्तांचे स्थलांतर करावे लागले. हजारो जनावरांना जलसमाधी मिळाली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.

वाचा:

यंदाही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने दक्षिण महाराष्ट्राला महापुराची चिंता सतावत होती. प्रत्यक्षात मात्र निम्मा पावसाळा उलटला तरी दक्षिण महाराष्ट्रात सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार सलामी दिल्याने यंदाही पावसाचा जोर राहील असे वाटत होते. मात्र, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने अधूनमधूनच हजेरी लावली. जुलै महिन्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. तिन्ही जिल्ह्यांच्या पश्चिम भागातील पिके पावसावरच अवलंबून असतात. पावसाने ओढ दिल्याने भात, नाचणीच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. याशिवाय सांगली, सातारा जिल्ह्यांतील सोयाबीन, भुईमूग पिकांवरही कमी पावसाचा परिणाम सुरू झाला आहे. पावसाची ओढ कायम राहिल्यास ऑगस्ट महिन्यात पिके करपण्याचा धोका आहे.

वाचा:

गेल्या वर्षी धरणक्षेत्रात अतिवृष्टीने पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश धरणे भरून ओसंडून वाहत होती. यंदा कोयना धरणात ४७ टक्के, धोम धरण ४९ टक्के, वारणा ५७ टक्के, राधानगरी ६२ टक्के, काळम्मावाडी ६५ टक्के भरले आहे. याशिवाय मध्यम आणि लहान तलावांचीही स्थिती बिकट आहे. काही अपवाद वगळता बहुतांश जलाशय अजून ५० टक्केही भरले नाहीत. हवामान खात्याने २८ ते ३० जुलैदरम्यान दक्षिण महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्यक्षात मात्र रिकामेच ढग पुढे जात असल्याने चिंता वाढली आहे. येणाऱ्या दोन महिन्यांत पावसाची ओढ कायम राहिल्यास गेल्यावर्षी महापुराचा फटका सहन करणाऱ्या दक्षिण महाराष्ट्राला यंदा दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो.

वाचा:

दुष्काळी भागाला मात्र दिलासा

नेहमी पावासाचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांत पावसाने दडी मारली असली तरी दुष्काळी तालुक्यांमध्ये मात्र पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर यासह सातारा जिल्ह्यातील माण, खटाव परिसरातही समाधानकारक पाऊस पडला आहे.

धरणांमधून विसर्ग थांबवला

सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवल्याने वेळेपूर्वीच धरणे पूर्ण क्षमतेने भरू नयेत यासाठी सर्वच प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता. कोयना, वारणा, राधानगरी या धरणांमधून रोज ५०० ते दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, पावसाचे प्रमाण कमी असल्याने गेल्या आठवड्यापासून प्रमुख धरणांमधील विसर्ग बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here