नागपूर: जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढतच असून बुधवारी यात आणखी ३०५ रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील करोना बाधितांची एकूण संख्या आता ४ हजार ७९२ झाली आहे. बुधवारी ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने नागपुरातील मृतांची संख्या आता १०७ झाली आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी ३ हजार ६९ रुग्ण बरे झाले असून १६१६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ( )

वाचा:

वाढती पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत असून बुधवारी यात ३०० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडली. बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला असून यातील दोघे नागपूरच्या बाहेरील आहेत. मृतांमध्ये पंचशीलनगर येथील ५० वर्षीय महिला, नारी रोड येथील येथील ६८ वर्षीय महिला, भरतनगर येथील ६५ वर्षीय महिला, गांधीबाग येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील २० वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिलासा देणारे आहे. बुधवारी ३७९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ हजार ६९ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याची टक्केवारी ६४.४ टक्के आहे.

वाचा:

करोनाची ताजी स्थिती

दैनिक करोना सदृष्य लक्षणे असलेले रुग्ण : २५८

पॉझिटिव्ह रुग्ण : ३०५

मृतांची एकूण संख्या : १०७

एकूण पॉझिटिव्ह : ४७९२

वाचा:

ग्रामीणमध्ये एकाच दिवशी ८० रुग्ण

ग्रामीणमध्येही रुग्ण वाढीचा वेग वाढला असून बुधवारी एकाच दिवशी ८० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीणमधील रुग्णांची संख्या आता १२५३ झाली असून आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला. आजच्या स्थितीला ग्रामीणमध्ये ६५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ती केवळ अफवा

वाढत्या करोनाच्या रुग्णांची संख्या पाहता ईद आणि रक्षाबंधन या सणांमुळे गर्दी होऊ नये यासाठी वाढविण्याचे मॅसेज सोशल मीडियावर बुधवारी व्हायरल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक झाली असाही उल्लेख त्यात होता. मात्र हा मेसेज फेक असून असा कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here