Gangapur Sugar Factory Election: औरंगाबादच्या (Aurangabad) गंगापूर सहकारी साखर कारखान्यासाठी झालेल्या निवडणुकीचे निकालाचे चित्र स्पष्ट होत असून, भाजप आमदार प्रशांत बंब यांना मोठा धक्का बसला आहे. प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनेल आणि या कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे (ठाकरे गट) कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनेलमध्ये सरळ लढत झाली होती. ज्यात डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेल बाजी मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे लासूर गटातून रिंगणात असलेल्या प्रशांत बंब यांचा देखील पराभव झाला आहे. 

रविवारी झालेल्या या निवडणुकीत एकूण 54 टक्के मतदान झाले. एकूण 14 हजार 66 मतदार सभासदांपैकी 7 हजार 598 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. तर एकूण 21 संचालकांपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने 20 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते. यासाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरु होती. दरम्यान आता निकालाचे आकडे पाहता चित्र स्पष्ट होत आहे. तर बंब यांच्या पॅनेलचा पराभव होताना दिसत आहे. तर फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याचे बोलले जात आहे. एकूण 20 जगासाठी ही निवडणूक झाली होती. 

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

Aurangabad: गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, प्रशांत बंब यांची प्रतिष्ठा पणाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here