अमरावती : लग्न म्हटलं की आई वडील मुलीसाठी स्थळ शोधतात ते आपल्या नातेवाईकांमधलं… जिल्ह्यातलं-तालुक्यातलं.. पण अमरावतीच्या एका मुलीने मिळालेल्या संधीचा फायदा उठवून थेट सातासमुद्रापारचा जावई आपल्या आई-वडिलांपुढे उभा केला. तिच्या पालकांनीही अजिबात आढेवेढे न घेता मुलीच्या सुखाला आपलं सुख मानून नवऱ्या मुलाला होकार कळवला. घरच्यांचा होकारानंतर जोडीने धुमधडाक्यात लग्न केलं.

जिल्ह्यातील दर्यापूर शहरात राहणारी श्रद्धा म्हस्के हिचा विवाह वर्षभरापूर्वी अमेरिकेतील अँण्ड्र्यू रॉबिन्स त्यांच्यासोबत पार पडला. अँड्र्यू रॉबिन्स हा अमेरिकेतील पोलीस दलात सायबर क्राईम विभागात कार्यरत आहे तर श्रद्धा वर्षभरापूर्वी एका टुरिस्ट कंपनीमध्ये काम करत होती. कामाप्रती धडपड व मनमिळाऊ स्वभाव तसेच परिस्थितीची जाण असणाऱ्या श्रद्धा म्हस्के हिने पर्यटक म्हणून आलेल्या शहा कुटुंबियांची मनी जिंकली. पुढे शहा कुटुंबीयांनी तिच्या लग्नाबद्दल विचारणा केली आणि आई-वडिलांच्या संमतीने अमेरिकेतील स्थळ तिला दाखवले.

मेहंदीच्या कार्यक्रमात भेट, पाहताक्षणी प्रेमात, हिंदू-मुस्लिम धर्म विसरले, माणुसकी धर्माने रबाना-अमोलला एकत्र आणलं!
कोरोना दरम्यान आंतरराष्ट्रीय आगमन बंद असताना अमेरिकेतील नवरदेव व श्रद्धा यांची घरच्यांच्या संमतीने ओळख झाली. पुढे एकमेकांच्या परिवाराला विश्वासात घेत दोघांनीही वर्षभरापूर्वी लग्न केलं. श्रद्धा अमरावती तर अँड्र्यू अमेरिकेमध्ये वास्तव्यास होते. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात लग्नाचा वाढदिवस असल्याने दोघेही दर्यापुरात दाखल झाले आणि प्रेमाचा इजहार करत लग्नाचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.

जातीमुळे लग्नाला नकार, दोघांनी झोपेच्या १५ गोळ्या घेतल्या, त्यातून वाचले, घरच्यांनी लग्न लावलं..!
अँड्र्यू व श्रद्धा हे दोघेही सध्या सुखाने संसार करीत आहे. तब्बल वर्षभराच्या विरहानंतर अँड्र्यू नुकतेच भारतात आले होते. व्हिसाच्या अडचणीमुळे सध्या तरी श्रद्धा माहेरीच राहते पण व्हिसा मिळाल्यावर लवकरच अमेरिकेत जाईन, असं श्रद्धाने ‘मटा ऑनलाईन’शी बोलताना सांगितलं. आम्ही एकमेकांपासून सातासमुद्रापार दूर असलो तरी आमचं दिवसातून किमान तीन ते चार वेळा बोलणं होतं. अँड्र्यू माझी खूप काळजी करतो, सतत ख्यालीखुशाली विचारत असतो, असं आपुलकीने श्रद्धा सांगत होती.

कॉलेजमध्ये नजरानजर, काही दिवसांत प्रेम, धर्माची भिंत आडवी आली, पण विरोध झुगारुन निकाह केलाच!
लग्नासाठी थेट सातासमुद्रापारचा जोडीदार निवडल्यानंतर अनेकांना ते खटकलं. मित्र मैत्रिणी, पै-पाहुणे नाराज झाले. काहींनी तर आमच्याशी बोलणं बंद केलं. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. लग्नाला आता एक वर्ष झालंय. आम्ही दोघेही अतिशय सुखात आहोत, अशा भावना नवदाम्पत्यांनी व्यक्त केल्या.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here