म.टा. प्रतिनिधी, नागपूरः होत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले असून अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळीचा माल जप्त केला. गणेशनगर येथील चंद्रभागा तेल भंडारवर छापा टाकून १ लाख ६७ हजार रुपये किमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. गेल्या १५ दिवसातील ही दुसरी कारवाई आहे.

गणेशनगर येथील चंद्रभागा तेल भंडारचे मालक महेश जैस्वाल अन्न सुरक्षा व मानदे कायदयाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे छापा टाकून खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. १५ लिटरच्या तेलाच्या डब्यात शेंगदाणा तेलाचे पॅकींग न करता खुल्या स्वरूपात विक्री करत असल्याचे आढळून आले. जप्त करण्यात आलेले खाद्यतेल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अभय देशपांडे यांच्या नेतृत्वात अनंतकुमार चौधरी यांनी ही कारवाई करण्यात आली.

तर इथे साथा संपर्क

या पुढील काळात सणासुदीच्या दिवसांचा विचार करता खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक आहे. भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास ०७१२-२५६२२०४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रकांत पवार यांनी केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here