भोपाळ: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका तरुणाने आपला जीव दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लासुदिया पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरुन सुसाईड नोट आढळून आली. यामध्ये जीव देणाऱ्या व्यक्तीने पत्नीच्या अवैध संबंधांचा उल्लेख केला आहे.

इंदूर येथील महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या हितेश पाल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जीव देण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोटही लिहिली होती. त्यात त्यांनी लिहिलं की, “माझी पत्नी नीतू पालचे कृष्णा राठौरसोबत अवैध संबंध आहेत. हे लोक मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. अनेकदा मी या दोघांनी सोबत पकडले आहे. नीतू घरात तंत्र-मंत्र देखील करायची. काही दिवसांपूर्वी मी त्यांना बागेत एकत्र पकडलं होतं.”

पैज लागली! १० मिनिटांत ३ क्वॉर्टर दारू संपवली; आयुष्याची बाजी लावून तरुण जिंकला, पण…
“यामध्ये आणखी एक महिला त्यांना साथ द्यायची. तिचं नाव राणी उदासी आहे. मी नीतू आणि कृष्णा यांच्या व्हॉट्सअॅप चॅटवर लक्ष ठेवत होतो. मला चॅटमधून अशीही माहिती मिळाली की, बागेत भेटल्यानंतर नीतू ही कृष्णाच्या खोलीतही जायची. ती कृष्णाला महागड्या भेटवस्तू द्यायची. ती मला सांगायची की तो माझा भाऊ आहे आणि पैशांचा व्यवहारही करायची. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा काही दिवसांपूर्वी नीतूने प्रियकर कृष्णाला एक मोठी गाडी भेट म्हणून दिली. ही कार नीलूच्या नावावर आहे”, असंही त्यांनी या पत्रात लिहिलं.

“नीतू, कृष्णा आणि राणी घरी एकत्र तंत्र-मंत्र करत असत. गेल्या वर्षभरापासून ती मला स्लो पॉयझन देत होती. यामुळे मी सुस्त होऊ लागलो होतो. माझे संपूर्ण शरीर काळे पडले आहे. हे सर्व शवविच्छेदनात कळेलच. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या सर्वांच्या चॅट्सशी चौकशी करून त्यांना शिक्षा सुनावण्यात यावी”.

व्यापारी दुकानाचे शटर उघडत होता, तेवढ्यात अनर्थ घडला, क्षणात लाखोंची रोकड गायब…
पत्नी नीतूने त्याला काहीतरी खाऊ घालून संपूर्ण मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली आहे, असेही त्याने या पत्रात सांगितलं. मृत्यूनंतर ही संपत्ती त्याचा मुलगा युवराज आणि आई-वडिलांना देण्यात यावी. तिला मला मारायचे होते, म्हणून तिने सगळीकडे नॉमिनी म्हणून आपले नाव टाकले आहे. माझ्या मृत्यूला हे तिघे जबाबदार आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं तपास अधिकारी बीएस कुमरावत यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here