इंटरनेटशिवायच होईल पेमेंट….
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, HDFC बँकेच्या या ऑफलाइन पे प्रोजेक्टमुळे ग्राहक, बँकेचे व्यापारी हे मोबाईल नेटवर्क नसतानाही पेमेंट पाठवू किंवा मिळवू शकतात. या प्रकल्प सुरु करणारी ही पहिली बँक आहे. जी पूर्णपणे ऑफलाइन मोडमध्ये डिजिटल पेमेंट करेल. यामुळे लहानं शहरं आणि कमी नेटवर्क असणाऱ्या ठिकाणी आर्थिक व्यवहार होण्यासाठी मोठी मदत मिळेल.
कुठे काम करेल ही सुविधा…
सर्व शहरांमध्ये ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अनेकदा मोठ्या कार्यक्रमांत, सणांवेळी किंवा गर्दीच्या ठिकाणी नेटवर्क काम करत नाही. अशावेळी तुम्ही ऑफलाइन पेद्वारे सहजरित्या पेमेंट करू शकता. इतकंच नाहीतर तुम्ही अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन, पार्किंग लॉट आणि किरकोळ स्टोरमध्येही कमी नेटवर्क असतानाही पेमेंट करू शकता. विमानात, सागरी प्रवासातही नेटवर्कशिवा पेमेंट करण्यास याची मदत होईल.
सप्टेंबरमध्येच मिळाली प्रकल्पाला मंजुरी…
RBI ने रेगुलेटरी सँडबॉक्ससाठी क्रंचफिशच्या भागिदारीत HDFC बँकेच्या अर्जाला मंजुरी दिली आहे. हा एक पायलट प्रोजेक्ट असून जर हा यशस्वी झाला कर ऑफलाइन डिजिटलमध्ये हे एक मोठं पाऊल असणार आहे, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.