मुंबई: २०१९ मध्ये राज्यातील राजकारणात तेव्हा मोठी खळबळ माजली होती, जेव्हा आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवारांसोबत सरकार स्थापन केलं होतं. जरी हे सरकार फक्त ७२ तासात कोसळलं असलं तरी आज तीन वर्षांनंतरही देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबाबतच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. याच शपथविधीबाबत स्वत: देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं विधान करत नव्या चर्चांना उधाण आणलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सरकार स्थापन झाल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. आता फडणवीसांच्या या गौप्यस्फोटावर खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाले. पहिला हा उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी निवडणुका आमच्यासोबत लढल्या, पण जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की ते मुख्यमंत्री होऊ शकतात तेव्हा त्यांनी माझा फोन घेणंही बंद केलं. त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची इतकी प्रिय होती की त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली.

बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरमध्ये जंगी स्वागत, भाचा सत्यजीतला दिला हा मोलाचा सल्ला
तर दुसरा हा राष्ट्रवादीने केला, पण त्यांना मी कमी दोष देईल कारण आम्ही निवडणुका त्यांच्यासोबत लढलो नव्हतो. उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करत असताना आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती की आम्हाला स्थिर सरकार हवंय. तेव्हा शरद पवारांशी चर्चा झाली होती. त्यानंतरच गोष्टी ठरल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या कशा बदलल्या हे सर्वांनी पाहिलं आहे. टीव्ही-९ मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवारांनी काय उत्तर दिलं?

देवेंद्र फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केल्यानंतर शरद पवारांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया देत म्हटलं, “देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं”.

मोठी बातमी: ठाकरे गटाच्या दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, जुन्या शिवसैनिकाची उचलबांगडी

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here