पुणे: रस्ता क्रॉस करत असणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेने जोराची धडक दिल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नऱ्हेगावाजवळील नवले पुलाजवळ असणाऱ्या एचडीएफसी बँकेसमोर सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर रुग्णवाहिका चालक पसार झाला असून अज्ञात चालकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कुमार लक्ष्मण अलकुंटे (वय – ३१, रा. दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. शेषेराव लक्ष्मण चव्हाण (वय – ४६, रा. लक्ष्मी स्पर्श सोसायटी, आंबेगाव खुर्द, पुणे) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात आणि बेशिस्त पादचारी नियमांकडे दुर्लक्ष करून रूग्णवाहिका चालक याने शेषेराव लक्ष्मण चव्हाण हे रस्ता ओलांडत असताना त्यांना जोरदार धडक दिली. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी न घेऊन जाता तो घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे अज्ञात चालकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव हे करीत आहेत.

त्यांना विचारुनच सरकार बनवलं, फडणवीसांचा बॉम्ब, आता शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
कंटेनरने चार वाहनांना धडक दिली

नवले पूल परिसरातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबात नाहीये. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने तब्बल चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघं जखमी झाले आहेत. ११ फेब्रुवारी शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. नऱ्हे येथील भूमकर पुल चौकात दररोज सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास वाहनांची मोठी गर्दी असते.

पुण्यात नवले पुलावर पुन्हा अपघात, कंटेनरची चार गाड्यांना धडक, क्रेटा चेंडूसारखी हवेत उसळली
ऐन गर्दीच्या वेळी या कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि परिसरात एकच हाहाःकार उडाला. या अपघातात कंटेनरने आधी मागून एका क्रेटा वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर दुचाकी आणि रिक्षासह तीन वाहनांना धडक दिली. वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान राखत दुसऱ्या रस्त्याने येणारी वाहतूक थांबविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here