नागपूर : खेळता खेळता डास मारण्याचे रीफिल प्यायल्याने एका दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सक्करदरा पोलिस स्टेशन हद्दीतील आशीर्वाद नगर येथे घडली. रिद्धी दिनेश चौधरी असे मृतकाचे नाव आहे. दिनेश चौधरी यांचे घरीच औषध विक्रीचे दुकान आहे. रविवारी दुपारी दिनेश यांच्या पत्नी कामात व्यस्त होत्या. रिद्धी ही पलंगावर खेळत होती.

खेळता खेळता तिला सॉकेटमध्ये लावलेले रीफिल दिसले. प्यायची वस्तू असल्याचा समज झाल्याने तिने रीफिलमधील लिक्विड प्यायले व बेशुद्ध झाली. दरम्यान, रिद्धीची आई खोलीत आली. तिला रिद्धी बेशुद्धावस्थेत दिसली. आईने आरडाओरड केली. दिनेश धावत खोलीत आले. लगेच रिद्धीला खासगी इस्पितळात नेले. प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नातेवाइकांनी तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी ३ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

प्रशांत बंब यांना पराभवाचा धक्का, गंगापूर कारखान्याची सत्ता ठाकरे समर्थक नेत्याकडे, विधानसभेला समीकरण बदलणार?
दरम्यान, वाढदिवसाची पार्टी आटोपून रस्ता पार करताना भरधाव कारच्या धडकेत मायलेक ठार तर अन्य एक वृद्ध महिला जखमी झाली. ही थरारक घटना रविवारी रात्री बेलतरोडी पोलिस स्टेशन हद्दीतील वर्धा मार्गावरील खापरी येथे रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. देवकाबाई महादेवराव पुंजरवार (वय ७२) आणि त्यांचा मुलगा गणेश (वय ५३, दोन्ही रा. सुयोगनगर, अजनी) अशी मृतकांची तर सुधाबाई सुधाकर गोरशेट्टीवार (वय ७१, रा. ओमनगर) असे जखमी वृद्धेचे नाव आहे.

आनंदाची बातमी! मुंबईत आता व्हॉट्सअॅपवर काढा मेट्रोचे तिकीट; फक्त या नंबरवर Hi मेसेज करा आणि…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here