तिरुअनंतपुरम: अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला भूमिपूजन करणार आहेत. यावरून राजकारण सुरू झाले आहे. यादरम्यान, केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांना पंतप्रधान मोदींनी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात जायला पाहिजे का? असा प्रश्न विचारला गेला. ‘राम मंदिर हा धर्म नव्हे तर भारतीय संस्कृती आणि संस्कृतीशी संबंधित एक विषय आहे. रामशिवाय भारतीय संस्कृतीची कल्पनाही करता येणार नाही, असं उत्तर खान यांनी प्रश्नाला दिलं.

‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केरळचे राज्यपाल आरिफ खान यांना हा प्रश्न विचारला गेला. स्वातंत्र्यानंतरची जी ध्येय वाक्य आहेत ती किमान १५० वेदांमधील आहेत. त्याला कोणतेही धार्मिक महत्त्व नाही, असं नाहीए. उलट ते (वेद) महान विवेकाबद्दल भाष्य करतात. संसदेच्या मुख्य दारावरील ‘वसुधैव कुटुंबकम्’ याचा स्रोत वेद-उपनिषदे आहेत, असं राज्यपाल आरिफ खान म्हणाले.

भारताची ज्ञानाची संस्कृती: अरिफ मोहम्मद खान

जगात भारताची ओळख त्याच्या ज्ञानाविषयी आहे. त्याने जगातील चार संस्कृतींची तुलना केली. त्याच वेळी, इराण आणि रोमन हे आलिशान, सौंदर्य या संस्कृतीसाठी ओळखले जातात. चीन कौशल्य आणि विधी संस्कृतीसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर, भारतीय संस्कृती ज्ञानाची आहे. विषम परिस्थितीतही भारताने आपली संस्कृती जपली आहे. रामायण भागांची उदाहरणे देताना आरिफ म्हणाले की भगवान राम यांच्या सुशासन आणि आदर्शातूनच हे सर्व शक्य झाले, असं काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here