मेजर डॉ. वीणा तिवारी यांचा फोटो व्हायरल
मेजर डॉ. वीणा तिवारी या भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. वीणा सध्या तुर्कीत बचावकार्यात व्यस्त आहेत. त्यांचे आजोबा आणि वडील देखील सैन्यदलात कार्यरत होते. मोहन चंद्र तिवारी हे कुमाऊ रेजिमेंटमधून सुभेदार म्हणून निवृत्त झाले होते. तिचे आजोबा खिलानंद तिवारी हे देखील कुमाऊ रेजिमेंटमधून सुभेदार म्हणून निवृत्त झाले होते, त्यांचं सध्याचं वय ८४ इतकं आहे. सैन्यदलाच्या सेवेचा वारसा लाभलेल्या वीणा तिवारी सध्या तुर्कीत बचावकार्यात सहभागी झालेल्या आहेत. ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारतीय सैन्य दलाकडून तुर्कीत मदतकार्य सुरु आहे. त्यामधील वीणा तिवारी यांचे एका चिमुकलीसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत.
दोन मुलींच्या बचावकार्यात एनडीआरएफच्या श्वानांची मदत
एनडीआरएफच्या पथकांकडून देखील तुर्कीत बचावकार्य सुरु आहे. भूकंपामुळं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या पथकातील चार श्वानांची देखील मदत घेतली जात आहे. रोमिओ आणि ज्यूली हे श्वान मातीच्या ढिगाऱ्याजवळ घुटमळले होते. त्यानंतर त्या ठिकाणचा ढिगारा मशिनरीच्या सहाय्यानं वेगळा केला असता, तिथं अडकलेली सहा वर्षीय मुलगी जिवंत आढळली. ९ फेब्रुवारीला मिराय करातस हिला देखील अशाच प्रकारे वाचवण्यात आलं होतं.
एनडीआरएफच्या गाझियाबाद आणि कोलकाता येथील पथकांकडून तुर्कीत बचावकार्य सुरु आहे.