याआधीही निधीसोबत पार्टी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या रंगू लागल्या होत्या. मात्र, पृथ्वी शॉ किंवा निधी या दोघांनीही याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पृथ्वी शॉने पहिल्यांदाच आपले प्रेम उघडपणे व्यक्त केले.

निधी तापडियासोबतचे त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. आता पृथ्वी शॉने निधीसोबतचा फोटो सोशल मीडियावर का शेअर केला आणि का डिलीट केला, हे कळले नाही. पण तोपर्यंत अनेकांनी त्याची ही स्टोरी पाहिली होती. निधी तापडिया मूळची नाशिकची आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या एका पोस्टवर जेव्हा पृथ्वी शॉने केलेली कमेंट चांगलीच व्हायरल झाली होती. निधीने लिहिले होते – लोक मला प्रेमाने लैला म्हणतात. पृथ्वी शॉने यावर कमेंट करत विचारले – हे लोक कोण आहेत? आणि यांच्या प्रेमाच्या चर्चांना अधिक दुजोरा मिळाला होता.
शॉने अलीकडेच १८ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केले. शॉ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा भाग होता परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. IPL 2023 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनण्यासाठी पृथ्वी आणि डेव्हिड वॉर्नर यांचे नाव आघाडीवर आहेत.