पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून गाव गुंडांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ येथील शिवली गावात ही घटना घडली आहे. शिवली गावातील कदम कुटूंबियांना मारहाण करण्यात आलं असून येण्या-जाण्याचा रस्ता खोदल्याने ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून नितेश अनंता आडकर, रामभाऊ नारायण आडकर, देविदास बबन आडकर, तानाजी रामभाऊ आडकर, संगीता अनंता आडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्याजवळ भरधाव ट्रकची १०-१२ गाड्यांना धडक, मुंबई-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील शिवली गावात कदम कुटुंबीय अनेक वर्षांपासून राहतं. त्यांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. त्यात यावरून कदम यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती. या गोष्टीचा राग आडकर यांच्या मनात होता. तोच येण्या-जाण्याचा रस्ता खोदल्याने आडकर कुटुंबियांनी कदम कुटूंबियांना फावडे, दगड आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या बेदम मारहाणीत कदम कुटुंबातील व्यक्ती जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली. या घटनेने मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सविता सुरेश कदम यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

Valentine Day : धर्माच्या सीमा ओलांडल्या, बंधने तोडली, रसिका आसिफचा आंतरधर्मीय प्रेम विवाह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here