समूहाने महसूल लक्ष्य घटवले
अदानी ग्रुपच्या कंपन्यांवर रिसर्च फर्म हिंडनर्गच्या नकारात्मक अहवालानंतर बहुतेक शेअर्सची किंमत त्यांच्या विक्रमी किंमतीपेक्षा निम्म्याहून कमी झाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण झाल्यानंतर रेटिंग एजन्सीही त्यांच्याबाबत सावध आहेत. यामुळे अदानी समूहाने आपले महसूल वाढीचे लक्ष्य ५०% कमी केले आहे. आणि भांडवली खर्चातही लक्ष्यातही बदल झाला आहे. सध्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आजही विक्री सुरू आहे. सध्या बाजार आणि गुंतवणूकदारांच्या नजरा अदानी एंटरप्रायझेसच्या निकालावर आहेत.
अदानीच्या शेअरमध्ये घसरण
आजच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांची घसरण तर अदानी टोटल गॅसमध्ये ५ टक्क्यांची घसरण होऊन ११३३ रुपयांपर्यंत खाली आली आहे. अदानी ट्रान्समिशनने लोअर सर्किटला ५% स्पर्श केला असून तो १०७१ रुपयांपर्यंत खाली आला आहे. अदानी पॉवरनेही ५ टक्क्यांचे लोअर सर्किट गाठले असून तो १४८ रुपयांपर्यंत खाली आले आहे. अदानी विल्मर पाच टक्क्यांनी घसरला असून तो ३९३ रुपयांवर आला आहे.
अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ६५४ वर आला आणि अदानी पोर्ट्स १ टक्क्यांनी वधारला आहे. एसीसीमध्ये सपाट ट्रेड होताना दिसत आहे तर एनडीटीव्हीमध्ये ५ टक्के आणि अंबुजा सिमेंटमध्ये सुमारे ३ टक्क्यांची घसरण होत असून हे शेअर्स त्यांच्या एक वर्षाच्या उच्चांकावरून ५० ते ६५ टक्क्यांनी घसरले आहेत.