नवी दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाने तुरुंगात राहून उच्चशिक्षण घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मला माझी सर्व शैक्षणिक कागदपत्रं मिळावीत, अशी मागणी आफताबने दिल्लीच्या साकेत न्यायालयाकडे केली आहे. आफताब पुनावाला याचे वकील एम.एस. खान यांनी न्यायालयात दोन अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांच्या माध्यमातून आफताबने आपल्याला पेन्सिल आणि वही उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून मला अभ्यासाच्या नोटस काढता येतील, असे आफताबाने आपल्या विनंती अर्जात नमूद केले आहे.

आफताब पुनावाला याला सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. आफताबने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत उपलब्ध करून द्यावी, असेही म्हटले आहे. तसेच मला याप्रकरणात पोलिसांनी सादर केलेले व्हिडिओ पुरावेही बघायचे असल्याची मागणी त्याने केली आहे. आफताबला दिल्ली पोलिसांनी आरोपपत्राची पेन ड्राईव्हमध्ये सॉफ्ट कॉपी देण्यात आली आहे. मात्र, या आरोपपत्राच्या पीडीएफचा फॉर्मेट आणि पुराव्यादाखल सादर करण्यात आलेले व्हिडिओ नव्या संगणक प्रणालीत उघडले जात नाहीत. दिल्ली पोलिसांनी जाणीवपूर्वक आपल्या आरोपपत्राची पीडीएफ वेगळ्या फॉर्मेटमध्ये दिल्याचा आरोप आफताब पुनावालाच्या वकिलांकडून करण्यात आला.
आफताबने श्रद्धाचं मुंडकं तीन महिने घरात ठेवलं, मिक्सरमध्ये टाकून हाडांचा चुरा, भुकटी रस्त्यावर फेकली
दिल्ली पोलिसांनी आफताब पुनावाला याच्याविरोधात तब्बल सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात आफताबने श्रद्धाचा खून कसा केला, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याचा सविस्तर तपशील नोंदवण्यात आला होता. यासोबत दिल्ली पोलिसांनी आफताबविरोधात अनेक पुरावेही न्यायालयात सादर केले आहेत. हे संपूर्ण प्रकरण रंजक आणि अंगावर काटा आणणारे असल्याने आफताब पुनावाला विरोधात काय कारवाई होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
Shraddha Aftab: लग्नाचा तगादा लावला म्हणून नव्हे तर ‘या’ कारणासाठी आफताबने श्रद्धाला संपवलं

काही दिवसांपूर्वी आफताबने स्वत:चे डेबिट आणि क्रेडिट कार्ड परत मिळावे, यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी दिल्लीत कडाक्याची थंडी होती, तापमानाचा पारा ३ ते ४ अंश सेल्सिअस इतका होता. आफताबकडे थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे कपडे नव्हते. घरच्यांनी माझ्याशी सर्व संबंध तोडून टाकले आहेत. त्यामुळे मला थंडीचे कपडे खरेदी करण्यासाठी क्रेडिट आणि डेबिट कार्ड मिळावे, अशी मागणी आफताबने केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here