मुंबई: अनेकजण आपल्या पार्टनरला काही ना काही गिफ्ट्स देत असतात. पण एका उद्योगपतीने तर आपल्या पत्नीला सर्वात महागडं गिफ्ट दिलं आहे. या उद्योगपतीने आपल्या पत्नीसाठी तब्बल २४० कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची डील देशातील सर्वात महागड्या निवासी मालमत्तेतील डीलपैकी एक आहे. पाहूया कोण आहे हे जोडपं.

हा २४० कोटींचा फ्लॅट विकत घेणारी व्यक्ती आहे बी. के. गोयंका. त्यांनी आपल्या सीईओ पत्नी दीपाली गोयंका यांच्यासोबत राहण्यासाठी मुंबईतील वरळी येथे हा फ्लॅट खरेदी केला होता. आता हे बी. के. गोयंका कोण आहेत? त्यांची पत्नी कोणत्या कंपनीची सीईओ आहे? या फ्लॅटशिवाय आणखी कोणती महागडी घरे त्यांच्या नावे आहेत, हे सर्व जाणून घेऊया.

हिंडेनबर्गला हरवण्यासाठी अदानींचा हाय प्रोफाइल प्लॅन तयार! गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकणारच

टाटांपेक्षा महाग फ्लॅट

बीके गोयंका यांनी मुंबईत तब्बल २४० कोटी रुपयांना फ्लॅट खरेदी केला आहे. या घराची किंमत रतन टाटा यांच्या घरापेक्षाही जास्त आहे. रतन टाटा यांच्या घराची किंमत १५० कोटी रुपये आहे. मुंबईतील वरळी येथे पेंटहाऊस आहे. वरळीतील थ्री सिक्स्टी वेस्ट इमारतीच्या ६३व्या, ६४व्या आणि ६५व्या मजल्यांमध्ये हे ट्रिपल डेकर पेंटहाऊस आहे. या पेंटहाऊसचे एकूण क्षेत्रफळ ३० हजार चौरस फूट आहे. मुंबईतील या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहण्याचा या उद्योगपतींचा विचार आहे.

२०१५ मध्ये जिंदाल कुटुंबाने १६० कोटी रुपयांचे घर घेतले होते. या घराचे एकूण क्षेत्रफळ १० हजार चौरस फूट होते. २०२२ मध्ये अभिनेता रणबीर कपूरने ११९ कोटी रुपयांना घर विकत घेतले. डिसेंबर २०२२ मध्ये देवव्रत डेव्हलपर्सने ११३ कोटी रुपयांना पाच लक्झरी अपार्टमेंट्स खरेदी केले. या सर्वांमध्ये वरचढ ठरत बी के गोयंकांनी हा फ्लॅट खरेदी केला आहे. पण नेमके कोण आहेत हे बी के गोयंका?

रतन टाटांच्या या शेअरने केलं मालामाल, १ लाख रुपये गुंतवणुकीतून मिळाले १२ कोटी

या समुहाचे मालक आहेत गोयंका

बीके गोयंका हे वेलस्पन या कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या वेलस्पन समूहाला कापड, पोलाद, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, गोदाम , तेल आणि वायू क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. त्यांनी १९८५ मध्ये त्यांची कंपनी सुरू केली. आता त्यांच्या या कंपनीचा विस्तार ५० देशांमध्ये झाला आहे. गोयंका यांनी विकत घेतलेला हा फ्लॅट आतापर्यंत देशातील सर्वात महागडा फ्लॅट आहे. फोर्ब्सनुसार बीके गोयंका यांची एकूण संपत्ती १.३ अब्ज डॉलर्स आहे.

दिपाली गोयंका या बीके गोयंका यांच्या पत्नी आहेत. त्या वेलस्पन इंडिया लिमिटेडमध्ये सीईओ आणि एमडी या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या लिंक्डइनवरील माहितीनुसार, त्या त्यांच्या नेतृत्वासाठी ओळखल्या जातात. त्यांची ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या होम टेक्सटाईल कंपन्यांपैकी एक आहे. त्यांची कंपनी युनायटेड स्टेट्समध्ये बेड, बाथ आणि रग उत्पादनांचा सर्वात मोठी पुरवठा करतात. फोर्ब्सने त्यांना आशियातील १६ व्या सर्वात प्रभावशाली व्यावसायिक महिला म्हणून स्थान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here