बँकेच्या शाखेला आग लावणाऱ्या व्यक्तीनं संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. सुरुवातीला पोलिसांचा यावर विश्वासच बसला नाही. ‘मला बँकेच्या एका कर्मचाऱ्याचा फोन आला होता. माझ्या खात्यातून संशयास्पद व्यवहार होत असल्याचं त्यानं सांगितलं. तुमच्या खात्यातून पैसे चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे ते दुसऱ्या खात्यात वळते करा, असं बँक कर्मचाऱ्यानं फोनवर सांगितलं होतं,’ अशी माहिती अटकेत असलेल्या व्यक्तीनं दिली.
बँक कर्मचाऱ्याच्या फोननंतर व्यक्तीनं पुढच्या काही दिवसांत १७ हजार पाऊंड्स (जवळपास १७ लाख रुपये) काही खात्यांमध्ये वळते केले. त्यानंतर त्याला येणारे फोन कॉल्स बंद झाले. हे सगळे पैसे फोनवरून गंडा घातलेल्यांना मिळवले. त्यामुळे ४८ वर्षीय व्यक्तीवर पश्चाताप करण्याची वेळ आली. मात्र प्रकरण इथंच थांबलं नाही. ‘तुझे पैसे पळवणाऱ्या, तुझी फसवणूक करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना धडा शिकव. त्यासाठी बँकेची शाखा पेटव,’ असं म्हणत त्याला भरीस पडलं. त्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तीनं बँकेची शाखा पेटवली.