कोल्हापूर : एका भीषण अपघातात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापुरातील सादळे मादळे घाटात घडली. अनिल बाबुराव वरोटे आणि नारायण तुकाराम मडके या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात मोटारसायकलींचा चक्काचूर झाला असून मृत व्यक्तींपैकी एक जण अपघातात जागीच ठार झाला. तर रुग्णालयात घेऊन जात असताना दुसऱ्याचा मृत्यू झाला.

करवीर तालुक्यातील सादळे-मादळे येथील सादळे कासारवाडी घाटात ही अपघाताची घटना घडली. कासारवाडीतून जात असताना कुरण माळाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत एक जण जागीच ठार झाला. तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराला रुग्णालयात तातडीने उपचारासाठी नेण्यात येत होतं. पण वाटेतच त्याचा झाला.

अनिल बाबुराव वरुटे (वय ३६, रा. कासारवाडी ), नारायण तुकाराम मडके (वय ३६, रा. मादळे) अशी मृतांची नावे आहेत. अनिल वरुटे हे आपल्या कुटुंबासह सादळे येथील साळुंखे फार्म हाऊसमध्ये मजूर म्हणून काम करत होते. तर नारायण तुकाराम मडके हे अपंग होते. अनिल वरुटे हे काल सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कासारवाडीकडे ( एम. एच. ०९-बी.डी. ९१६१ ) येत होते. तर नारायण मडके हे मादळेकडे ( एम. एच. ०९- डी. डब्ल्यू. ०३०७ ) जात होते. या दोघांना समोरून गाडी येत असल्याचा अंदाज न आल्याने दोघांच्या वाहनाची धडक होऊन हा अपघात झाला.
कोथरुडऐवजी कसब्यात निवडणूक लढवणार का? चंद्रकांत पाटील हसत हसत म्हणाले…
हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला. या अपघातात अनिल वरुटे यांच्या डोक्याला जोरात मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर नारायण मडके हे गंभीर जखमी होते. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. पण रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातानंतर मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

डॉक्टर मित्रानेच केला व्यापाऱ्याचा घात; भेटण्यासाठी आल्यावर सुपारी देऊन संपवलं; एक संशयित ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here