जळगाव : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील तरूणाने गावानजीक असलेल्या तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता समोर आली आहे. गणेश संजय सोळुंखे (वय-२३) रा. कोळन्हावी ता. यावल असे मयत तरूणाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

कोळन्हावी इथे गणेश सोळुंखे हा आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचा. सोमवारी दुपारी घरात कुणाला काहीही एक न सांगता गणेश हा थेट गावानजीक असलेल्या तापी नदीच्या पुलावर पोहचला. या ठिकाणी त्याने पुलावरून तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.

समृद्धी महामार्गावर भरधाव कार थेट संरक्षण कठड्यावर चढली, ३० फूट खोल पडता-पडता…; पाहा VIDEO
कुणीतरी तरुणाने तापी नदीत उडी घेतल्याचे नदीच्या काठावर असलेल्या गुरे चारणाऱ्यां गुरांख्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना ही घटना सांगितली. ग्रामस्थ व गुराखी घटनास्थळी पोहचले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. गावातील ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने मृतदेह तापी नदीतून बाहेर काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विसपुते यांनी मयत घोषीत केले.

मयत गणेश यांच्या पश्चात आई विठाबाई, वडील संजय पांडूरंग सोळुंखे आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्यामकांत बोरसे करीत आहे.

भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, या ६ देशांतून येणार्‍यांसाठी आजपासून नवे नियम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here