मुंबई :अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसने जबरदस्त कामगिरी नोंदवली केली आहे. या तिमाहीत कंपनीने ८२० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वर्ष २०२१ च्या डिसेंबर तिमाहीत कंपनीला ११.६३ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तिमाही निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सने उसळी घेतली. शेअर बाजार बंद होताना कंपनीचा शेअर्स ३२ रुपयांनी वधारून १७५० रुपयांवर बंद झाला.

Hindenburg चा कहर सुरूच! जाणून घ्या अदानींच्या प्रमुख कंपनीच्या शेअर्सची आजची स्थिती
महसूल वाढला
डिसेंबर तिमाहीत अदानी एंटरप्रायझेसचा महसूल ४२ टक्के वाढून २६ हजार ६१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत महसूल १८ हजार ७५८ कोटी रुपये होता. याशिवाय डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या खर्चात वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर खर्च २६ हजार १७१ कोटींवर गेला, जो एका वर्षापूर्वी १९,०४७.७ कोटी रुपये होता. न्यू एनर्जी इकोसिस्टम व्यवसायाचा महसूल दुपटीने वाढून १४२७.४० कोटी रुपये झाला. विमानतळ व्यवसायाचा महसूलही दुपटीने वाढून १७३३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

हिंडेनबर्गला हरवण्यासाठी अदानींचा हाय प्रोफाइल प्लॅन तयार! गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकणारच
निकाल महत्त्वाचा
इंटिग्रेटेड रिसोर्स मॅनेजमेंट बिझनेसमधून कंपनीचा महसूल वार्षिक ३८ टक्क्यांनी वाढून १७ हजार ५९५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. खाण व्यवसायातील उत्पन्न तिप्पट वाढून २,०४४ कोटी रुपये झाले. हिंडेनबर्ग संशोधन अहवालामुळे संपूर्ण अदानी समूह अनेक समस्यांना तोंड देत असताना कंपनीचे तिमाही निकाल आले आहेत. या अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेससह अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Hindenburg ने लुटलेली तिजोरी भरेल ही कंपनी, जाणून घ्या अदानींच्या या दडलेल्या खजिन्याबद्दल
एफपीओ रद्द
अदानी एंटरप्रायझेसचा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ (FPO) लॉन्च करण्यात आला होता. एफपीओ २७ ते ३१ जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. पण याआधी २४ जानेवारीला अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्गने अदानी ग्रुपवर एक नकारात्मक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात हिंडेनबर्गकडून अदानींवर अकाउंटिंग फ्रॉड आणि शेअर्समध्ये फेरफार यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर अदानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर १ फेब्रुवारीला अदानी समूहाने एफपीओ मागे घेण्याची घोषणा केली. तेव्हापासून अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स जवळपास ६० टक्क्याने घसरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here