या हत्या प्रकरणात रोहित गहलोत नावाच्या तरुणाचादेखील सहभागी आहे. पोलिसांनी त्यालादेखील ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. रोहित हा साहिलचा मित्र आहे. मृतदेहातून दुर्गंधी पसरू नये यासाठी त्यांनी तरुणीचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. मृत तरुणीचं साहिलवर प्रेम होतं. तिला साहिलसोबत लग्न करायचं होतं. मात्र साहिल लग्नासाठी तयार नव्हता. तरुणीनं लग्नासाठी भुणभुण लावल्यानं साहिलनं तिची हत्या केली.
श्रद्धा प्रकरणाची पुनरावृत्ती
याआधी दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली. दिल्लीच्या महरौलीत श्रद्धाची हत्या करण्यात आली. प्रियकर आफताब पुनावालानं तिला गळा दाबून संपवलं. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. रोज रात्री घरातून बाहेर पडून आफताब एक-एक तुकडा महरौलीजवळ असलेल्या जंगलात फेकून द्यायचा. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. त्याची इतर प्रेयसीदेखील त्याला त्याच फ्लॅटमध्ये भेटायला यायच्या.
पोलिसांनी आफताबला १२ नोव्हेंबरला अटक केली. आफताबची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट करण्यात आली. त्यात त्यानं हत्येची कबुली दिली. श्रद्धाच्या हत्येनंतर अनेक तरुणींशी संबंध ठेवल्याचंही त्यानं सांगितलं. पोलिसांनी महरौलीतील जंगलातून श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे गोळा केले. त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली.