नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा १ डाव आणि १३२ धावांनी पराभव केला. आता दोन्ही संघातील दुसरी लढत १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाची कामगिरी सध्या अव्वल होत असून खेळाडूंचा आत्मविश्वास देखील कमालीचा उंचावला आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशचा पराभव केल्यानंतर आता टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत धमाकेदार सुरुवात केली आहे. पण आज टीम इंडियातील अशा ३ खेळाडूंबद्दल बोलणार आहोत ज्यांनी एकेकाळी कसोटीत दमदार कामगिरी केली होती. पण आता ते संघाच्या जवळपास देखील नाहीत. त्यांचे करिअर संपले आहे आणि येत्या काही काळात ते कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती देखील घेऊ शकतात.

१) शिखर धवन
भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी आणि स्टार सलामीवीर शिखर धवनसाठी गेल्या काही दिवापासून गोष्टी ठीक होत नाहीत. कसोटी संघापाठोपाठ त्याला टी-२० आणि वनडे संघातून वगळण्यात आले. शिखर भारतात होणाऱ्या २०२३च्या वनडे वर्ल्डकपच्या खेळाडूंच्या यादीत नाही. शिखरने २०१३ साली कसोटी करिअरची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार शतक करून केली होती. शिखरने पदार्पणाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची धुलाई केली होती. मर्यादीत षटकाच्या क्रिकेटपाठोपाठ शिखर कसोटीत धमाका करेल असे वाटत होते पण तो हळूहळू फ्लॉप होत गेला.

WPLमधील पहिली करोडपती;३ कोटींच्या बोलीनंतर स्मृतीची पहिली प्रतिक्रिया; भारतीय संघाने केला असा जल्लोष
मोठी धाव संख्या खेळण्यात अपयशी ठरलेल्या शिखरला संघाबाहेर कधी केले हे कळाले देखील नाही. शिखरने भारताकडून अखेरची कसोटीत २०१८ साली इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्याने भारताकडून ३४ कसोटीत ४०.६च्या सरासरीने २ हजार ३१५ धावा केल्या आहेत. ज्यात ७ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

२) भुवनेश्वर कुमार
भारतीय संघातील अनुभवी आणि स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला देखील टीममधून बाजूला करण्यात आले. एक वेळ अशी होती भुवी भारताचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज होता आणि तिनही फॉर्मेटमध्ये खेळत होता. मात्र अचानक त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी त्याला वनडे आणि टी-२० संघातून वगळले गेले.

WPL Auction: टीम इंडियाची ‘शेरनी’ मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात; का लावली १.५० कोटींची बोली
भुवीचे कसोटी करिअर तर २०१८ सालीच संपले होते. चांगली कामगिरी केल्यानंतर देखील त्याला संघाबाहेर करण्यात आले. भुवीने भारतासाटी २१ कसोटी खेळल्या त्यात २६.१च्या सरासरीने ६३ विकेट घेतल्या होत्या.

३) इशांत शर्मा
भारतासाठी १०० हून अधिक कसोटी खेळणारा जलद गोलंदाज इशांत शर्माचा देखील समावेश अशा खेळाडूंमध्ये होतो ज्यांचे कसोटी करिअर संपले आहे आणि लवकरच निवृत्ती जाहीर केली जाऊ शकते. इशांत २०२१ पर्यंत भारतासाठी सातत्याने कसोटी खेळत होता. त्यानंतर संघात असे जलद गोलंदाज आले, ज्यामुळे इशांत संघाबाहेर फेकला गेला.

RCBच्या संघात सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, ऑलराउंडरवर १.७ कोटीची लागली बोली
आता इशांतला कसोटीत संधी मिळत नाहीय. त्याने २०२१ मध्ये अखेरची कसोटी खेळली होती. वाढत्या वयामुले इशांत निवृत्ती घेऊ शकतो. त्याने भारताकडून १०५ कसोटीत ३२.४च्या सरासरीने ३११ विकेट घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here