मुंबई- अभिनेता श्रेयस तळपदेने २०१२ मध्ये एका चित्रपटात काम केले होते. पण त्यानंतर ११ वर्षांनी त्या चित्रपटाच्या एका दृश्यामुळे वाद निर्माण होतील आणि त्यासाठी त्याला माफीही मागावी लागेल असे त्याला स्वप्नातही वाटले नसेल. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कमाल धमाल मालामाल’ या चित्रपटातील एका दृश्यामुळे काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून त्यामुळे अभिनेत्यावर जोरदार टीका होत आहे.

मुंबई- पुणे- मुंबई! वयात अंतर तरी नातं अगदी सुपरकूल, अभिनेत्रीने सांगितला हिट फॉर्म्युला
सोशल मीडियावर चिघळत चालेला वाद पाहून श्रेयसने शेवटी माफी मागितली आहे. १३ फेब्रुवारीला, अभिनेत्याने सोशल मीडियावर सर्वांची माफी मागणारी एक नोट लिहिली, ज्यामध्ये त्याने शूटिंगच्या वेळेला निर्माण झालेली परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

नक्की कशाने झाला वाद

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली कमाल धमाल मालामालची व्हिडिओ क्लिप ३० सेकंदांची आहे. यामध्ये श्रेयस तळपदे एका लॉरीला लाथ मारून थांबवताना दिसत आहे. पण लॉरी थांबवताना श्रेयसचा पाय जिथे पडला, तिथे ‘‘ हा शब्द लिहिलेला दिसतो. यासाठी युजर्सनी श्रेयस तळपदेला टार्गेट करायला सुरुवात केली. युजर्सनी श्रेयसवर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. श्रेयसने ‘कमाल धमाल मालामाल’मध्ये जॉनी नावाची ख्रिश्चन व्यक्तिरेखा साकारली होती.

श्रेयस तळपदेवर संतापले युजर्स

ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ख्रिश्चन माणूस ‘‘ या शब्दावर पाऊल ठेवत आहे. उर्दूवुडमध्ये इतर कोणत्याही धर्माचा असा अनादर पाहिला आहे का? हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. तो पाहून युजर्सने श्रेयसला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र आता श्रेयस तळपदेने सर्वांची माफी मागितली आहे.

श्रेयसने माफी मागून, कोणत्या परिस्थितीत हे घडले ते सांगितले

श्रेयसने ट्वीट करत लिहिले की, ‘शूटिंग करताना अनेक घटक गुंतलेले असतात. शूटिंगच्या सीक्वेन्स दरम्यान एखाद्याची मानसिकता काय असते. विशेषतः अॅक्शन सीन्सच्या वेळी, दिग्दर्शकाची गरज काय असते यासोबतच वेळही महत्त्वाचा असतो. इतरही तत्सम गोष्टींचा समावेश असतो. पण तुम्ही मला व्हिडिओमध्ये काय करताना पाहता ते मी स्पष्ट करण्याचा किंवा समर्थन करण्याचा प्रयत्न करत नाही.

गोड आठवणी! सुमितचा वनिता खरातच्या प्रेमात पडणारा क्षण, तुमच्या बाबतीतही होऊ शकतं असं
मी एवढेच सांगेन की त्यावेळी कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. याबद्दल मी माफी मागतो. तेव्हा मी ते लक्षात घेऊन दिग्दर्शकाच्या निदर्शनास आणायला हवे होते. मी कधीही कोणाच्याही भावना दुखावणार नाही आणि यापुढे असे प्रकार करणार नाही.

श्रेयसची ‘पुष्पा’शी चर्चा

अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने २०२२ मध्ये ‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटात दिसला होता. सुमारे १८ वर्षांपूर्वी आलेल्या ‘इक्बाल’ चित्रपटातून रातोरात स्टार झालेला श्रेयस तळपदेने ‘पुष्पा: द राइज’मध्ये पुष्पाचा म्हणजेच अल्लू अर्जुनच्या आवाजासा डब करुन प्रसिद्धीच्या झोतात आला होता. तो बॉलिवूड व्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here