दिल्लीत आतापर्यंत ३४ कसोटी मॅच झाल्या आहेत. यापैकी १३ मध्ये विजय तर ६ मध्ये टीम इंडियाचा पराभव झालाय. १९८७ साली भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटीत पराभव झाला होता. या पराभवानंतर टीम इंडियाने या मैदानावर एकही मॅच गमावली नाही.
नागपूर कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली होती. आता दिल्लीच्या मैदानावर पुन्हा एकदा फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता आहे. येथील खेळपट्टी काळ्या मातीपासून तयार केली असून चेंडू अधिक उसळी घेतो. जर खेळपट्टीने पुन्हा साथ दिली तर रविंद्र जडेजा आणि आर अश्विन तसेच अक्षर पटेल पुन्हा ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरतील.
भारताचा संभाव्य संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका वेळापत्रक
पहिली कसोटी, नागपूर- भारताचा १ डाव १३२ धावांनी विजय
दुसरी कसोटी, दिल्ली- १७ ते २१ फेब्रुवारी
तिसरी कसोटी- १ ते ५ मार्च
चौथी कसोटी- ९ ते १३ मार्च