love affair, लग्नाला झाले होते फक्त ४ महिने, विवाहित पुतणी काकासोबत पळून गेली; घरातील २ लाख रुपये, दागिनेही नेले – after 4 months of marriage the married woman ran away with her uncle
नूह : हरियाणातील नूह जिल्ह्यातील सीलखो गावात एका महिलेने घरातून २ लाख रुपये रोख आणि सुमारे दीड लाखांचे दागिने घेऊन प्रियकरासह पळ काढला. आपली पत्नी ज्या व्यक्तीसोबत पळून गेली होती ती व्यक्ती आपल्या पत्नीचा काका आहे असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे. पीडित पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
साहून येथील रहिवासी असलेल्या या पीडित पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पीडित पतीचे झिमरावत फकिराबस येथील रहिवासी असलेल्या मुस्कान हिच्यासोबत ४ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पतीला धक्का बसेल असे गुपित पीडित पतीला कळले. लग्नानंतर काही कालावधीनंतर झिमरावत येथील सद्दाम याच्यासोबत पत्नीचे प्रेमसंबंध सुरू असल्याचे निष्पन्न झाले. सद्दाम हा दुसरा तिसरा कोणी नसून तो मुस्कान हिचा काका आहे. हे पाहून पीडित पतीला धक्का बसला. पुण्यात खळबळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, भररस्त्यात गैरवर्तन केल्याचा आरोप या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या १ महिन्यानंतर प्रियकर सद्दाम पत्नीला भेटायला आला. त्यावेळी त्याला सेलखो गावात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर पंचायत स्तरावर घेतलेल्या निर्णयात त्यांना गावात परत येणार नाही या अटीवर सोडून देण्यात आले. गावबंदी झाल्यानंतरही सद्दामने आपले कृत्य सोडले नाही आणि गेल्या रविवारी रात्री पत्नीला फूस लावून पळवून नेले, असा पीडित पतीचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेत सद्दामच्या कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा दिला आहे, असाही पीडित पतीचा आरोप आहे.
आपल्या काकासोबत पळून गेलेल्या या महिलेने घरातून दोन लाख रुपयांची रोकडही सोबत नेली. इतकेच नाही तर, दीड लाख रुपयांचे दागिने आणि मोबाइल फोन देखील ती घेऊन गेल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे. सद्दाम व्यतिरिक्त हसम, मुबीना, दिनू आणि टपकन रहिवासी मुस्ताक यांचाही त्याच्या पत्नीला पळवून नेण्यात हात असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. चार पैकी २ मुलं झाली बेपत्ता; चार दिवसांनी दिसले धक्कादायक दृश्य, पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली