विशेष म्हणजे फिलिप यांना टक्कल पडलेलं आहे. त्यांच्या डोक्यावर एकही केस नाही. मात्र तरीही त्यांनी टक्कल पडल्याचं कारण देत मार्क यांना कामावरून काढलं. मार्क यांना हा निर्णय पटला नाही. आपण आणखी २ वर्ष कंपनीत कार्यरत राहिलो असतो, तर कर्मचारी म्हणून आपल्याला पूर्ण अधिकार मिळाले असते. त्यामुळे जाणूनबुजून आपल्याला कामावरून काढण्यात आल्याचं मार्क म्हणाले.
मार्क यांनी कायदेशीर बाबींचा विचार केला. कायद्याच्या जाणकारांचा सल्ला घेऊन त्यांनी बॉससोबतच कंपनीविरोधात खटला दाखल केला. ‘केवळ टक्कल असल्यानं कोणाला नोकरीवरून काढता येत नाही,’ असा आदेश न्यायालयानं दिला. बॉस आणि कंपनीनं कर्मचाऱ्याला ७० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले आहेत. फिलिप कंपनीत संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा वार्षिक पगार ६० लाख रुपये आहे.
गेल्या मार्चमध्ये मार्क यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्याआधी त्यांनी आपल्या कंपनीविरोधात खटला भरला. ‘मी अतिशय निराश आहे. तक्रार अहवालात खोटी माहिती देण्यात आली. मला काढून टाकण्यासाठी कुभांड रचण्यात आलं,’ असं मार्क यांनी त्यांच्या राजीनाम्यात नमूद केलं होतं.