त्या शेतामध्ये उभ्या असलेल्या व्यक्तीला गांजा लागवड केलेले शेत कोणाचे आहे, याबाबत विचारणा केली असता त्याने ते शेत त्याच्या स्वतःच्या मालकीचे तसेच लागवड केलेल्या गांजाच्या झाडांची जोपासणा करीत असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी १,३३१ गांजाची झाडे जप्त केली. त्याचे वजन केले असता ते ४२३.०२ किलोग्रॅम इतके भरले. जप्त केलेल्या गांजाच्या झाडांची किंमत १ कोटी ०५ लाख ७५ हजार ५०० रुपये इतकी आहे. संशयित आरोपी कुंडलिक निवृत्ती खांडेकर (वय ४९) याने डाळिंबाच्या शेतात लागवड आणि जोपासणा केल्याचं आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
Home Maharashtra Cannabis plants seized in satara, डाळिंबाच्या बागेत १ कोटींची शेती, पाहून पोलीसही...
Cannabis plants seized in satara, डाळिंबाच्या बागेत १ कोटींची शेती, पाहून पोलीसही चकित, सातऱ्यातील सर्वात मोठी कारवाई… – cannabis plants in pomegranate farm worth rupees one crore seized in satara
सातारा: डाळिंबाच्या शेतामध्ये गांजाच्या झाडांची विक्री करण्यासाठी लागवड आणि जोपासणा करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी १ कोटी ५ लाख ७५ हजार ५०० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. अंमली पदार्थांबाबत सातारा जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली. संशयित आरोपी कुंडलिक निवृत्ती खांडेकर (वय ४९, वर्षे रा. लोणार खडकी, ता. माण, जि. सातारा) याला पोलिसांनी अटक केली आहे.