लखनऊ: उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. जिथे एका व्यसनी जावयाने आपल्या सासूवर काठी आणि कुऱ्हाडीने हल्ला चढवला. ही महिला आपल्या मुलीला जावयापासून वाचवायला गेली होती. मात्र, यावेळी जावयानेच आपल्या सासूवर हल्ला केला. त्यानंतर आरडाओरड ऐकून आसपासचे लोक जमा झाले आणि त्यांनी तात्काळ जखमी सासूला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली.

रायबरेली जिल्ह्यातील बछरांवा पोलीस स्टेशन क्षेत्रातील इचौली गावात राहणाऱ्या उमतुन्निशाने तिची मुलगी सलमाचा विवाह लखनऊ येथील अब्दुल करीमसोबत लावून दिला होता. अब्दुल करीम आणि सलमा यांना दोन मुलं आहेत. अब्दुल करीमला दारुचं व्यसन असून तो दारूच्या नशेत नेहमी पत्नीशी भांडत असत. यालाच कंटाळून सलमा ही तिच्या आईकडे निघून आली. काही दिवसांनी अब्दुलही सासरी आला. काल संध्याकाळी उशिरा तो दारुच्या नशेत सासूच्या घरी पोहोचला आणि पुन्हा पत्नीशी भांडण करु लागला.

व्यक्तीच्या मृत्यूची वेळ कळणं आता शक्य होणार! डॉक्टरांचा शोध अन् जगात एकच खळबळ
अब्दुल जेव्हा सलमाला मारहाण करु लागला तेव्हा तिची आई तिला वाचवायला आली. पण, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अब्दुलने सासूवरही काठीने हल्ला केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने सासूवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर सलमाने आरडाओरड केली आणि आसपासचे लोक तिथे जमा झाले. तेव्हा अब्दुलने तेथून पळ काढला. उपस्थित लोकांनी जखमी झालेल्या सासूला उपचारासाठी सीएचसी बछरांवा येथे नेम्यात आले.

पैज लागली! १० मिनिटांत ३ क्वॉर्टर दारू संपवली; आयुष्याची बाजी लावून तरुण जिंकला, पण…
उपस्थितांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अब्दुलला अटक केली. तसेच, पीडितेच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here