नवी दिल्ली: भारतात विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या बरोबरच करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढते आहे. देशभरात आतापर्यंत करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३५ हजारांच्या पुढे गेली आहे. मात्र, त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत देशभरात १० लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

करोनाच्या आकड्यांवर नजर ठेवणारी वेबसाइट वल्डोमीटरच्या माहिती नुसार, भारतात आतापर्यंत करोनाची लागण झालेले १५,८४,३८५ रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये ५० हजारांहून अधिक रुग्ण वाढले आहेत. तसेच २४ तासांमध्ये ७७९ रुग्ण बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत १०,२१,६११ रुग्ण करोनापासून मुक्त झाले आहेत.

करोना रुग्णसंख्येच्या दृष्टीने भारत जगात तिसरा

भारत करोनाचा संसर्ग पसरलेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकारवर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत करोनाचे ४५ लाखांहून अधिक रुग्ण आहेत. तर तेथे आतापर्यंत १.५ लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे ब्राझील. येथे आतापर्यंत २५ लाखांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे, तर ९० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा:

महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाउन

महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य आहे जेथे करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४ लाखांहून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून महाराष्ट्र सरकारने लॉकडाउनमध्ये पुन्हा वाढ करत तो ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. असे असले तरी ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत काही सूटही देण्यात आली आहे.

वाचा:

५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडणार आहेत. तर मॉल्समधील चित्रपटगृहे आणि रेस्टॉरंट्स बंदच राहणार आहेत. त्याच बरोबर सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सूट देताना मात्र फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटेशनबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची अट घालण्यात आली आहे.

ही बातमी नक्की वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here