मात्र, रोमँटिक प्रेम केवळ प्रजननासाठी नाही. काहींच्या म्हणण्यानुसार भूक, तहान, झोप किंवा सेक्स यांसारखेच प्रेम हेही एक प्रेरणा आहे. इतरांवर प्रेम करण्याचे आणि आपल्यावर कुणीतरी प्रेम करणे याचे अनेक फायदे आहेत. यामळे मानसिक आरोग्य, कल्याण आणि रोगप्रतिकारक कार्य सुधारते, तसेच तीव्र ताण आणि आजार कमी होतात. जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा प्रेमात पडते तेव्हा काय होते? जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विशेष आणि अद्वितीय म्हणून पाहू लागते तेव्हा त्या व्यक्तीचे प्रेमात पडणे सुरू होते. प्रेमात पडण्याचा प्रारंभिक टप्पा ही एक अत्युच्च अशी न्यूरोबायोलॉजिकल अवस्था आहे. ही प्रेमाची भावना उच्च प्रतिक्रियाशीलता आणि उच्चकोटीच्या उत्कटतेने दर्शविली जाते. वासना आणि आकर्षण हे सेक्ससाठी प्रेरणेच्या रुपात लैंगिक संप्रेरक, इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन द्वारे चालविले जाते. जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा मेंदूचे विशिष्ट भाग सक्रिय होतात, विशेषत: लिंबिक सिस्टम आणि रिवॉर्ड सेंटर.
प्रेमात पडण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात तणावाची भावना
लिंबिक प्रणाली भावना आणि स्मरणशक्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यामुळे सकारात्मक मनःस्थिती निर्माण होते आणि नवीन प्रेमाशी संबंधित आठवणी इतक्या मजबूत का आहेत हे स्पष्ट करते. डोपामाइन प्रेमाची आवड जोपासण्यासाठीची प्रेरणा आणि झोकून देण्याच्या प्रवृत्तीत वाढ करते. Noradrenaline मुळे आनंदाची भावना निर्माण होते. यामुळे जलद हृदय गती, ऊर्जेत वाढ असे बदल शरीरात जाणवतात. त्याच वेळी, मेंदूचे इतर भाग निष्क्रिय होतात. फ्रंटल कॉर्टेक्समधील क्रिया कमी केल्याने नकारात्मक भावना आणि नकारात्मक निर्णय कमी होतात. लोक सुरुवातीला आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कमतरतांकडे डोळेझाक करतात. पण प्रेमात पडण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात कॉर्टिसोल, तणाव आणि असुरक्षितता वाढते.
काळानुसार रोमँटिक प्रेम कसे बदलत जाते?
प्रेमात आणि तीव्र मोहात पडण्याचा प्रारंभिक टप्पा अनेक महिने टिकतो. पुढील टप्प्यात, जवळीक, बांधिलकी आणि संलग्नता वाढते. हे ऑक्सीटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन या संप्रेरकांद्वारे होते. प्रेमात पडण्याची जोखीम घेतल्यानंतर ऑक्सीटोसिनमुळे आपल्याला सुरक्षित असल्याचे वाटते. ऑक्सीटोसिन आणि व्हॅसोप्रेसिनमध्ये दुसऱ्याशी जोडले जाण्याचे संतुलन असते. याबरोबरत ते तुमची आणि तुम्ही जिच्या प्रेमात पडला आहात त्या व्यक्तीच्या संबंधांचे रक्षण करतात. ऑक्सीटोसिनला सहसा “प्रेमाचे संप्रेरक” म्हटले जाते. कारण ते सामाजिक बंधन आणि नातेसंबंधांची निर्मिती करण्याचे काम करते. लैंगिक क्रिया प्रेमापेक्षा भिन्न आहे, परंतु ती आसक्तीला अधिक मजबूत करते. जेव्हा आपण स्पर्श करतो, चुंबन घेतो किंवा लैंगिक संबंध ठेवतो तेव्हा ऑक्सीटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन सोडले जातात. यामुळे जोडप्यामधील प्रेम आणि वचनबद्धता वाढवते.
ऑक्सिटोसिनचा मानवी आरोग्यावर चांगला परिणाम होतो
उच्च आत्मीयता आणि बांधिलकी प्रेम टिकवून ठेवण्यास मदत करतात. कमी उत्कटतेमुळे काही नातेसंबंध नाते मजबूत होण्याच्या प्रक्रियेच्या टप्प्यावर फिके पडतात, तर काहींचे प्रेम उत्कटता नसल्याने संपुष्टात देखील येते. रोमँटिक नसलेल्या प्रेमाबद्दल काय? रोमँटिक नसलेल्या प्रेमात कुटुंब, मित्र आणि अगदी पाळीव प्राण्यांसह सर्व प्रकारच्या प्रेमामध्ये ऑक्सिटोसिन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ऑक्सिटोसिनचे सकारात्मक सामाजिक संबंध, मानवी आरोग्य, कल्याण आणि दीर्घायुष्यासाठी अनेक फायदे आहेत. ऑक्सिटोसिनवर जीवनाची चांगली गुणवत्ता आणि निरोगी सामाजिक संबंध अवलंबून आहेत.
प्रेम हे निसर्गाचे सर्वोत्तम रासायनिक संयोजन असू शकते. पण प्रेमात पडणाऱ्यांचे गुंतागुंतीचे वागणे आणि प्रेमाच्या भावनेतील सर्व गुंतागुंत या विज्ञानाच्या पलीकडे आहेत.